शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही मला मूर्ख समजू नका; शिवतारेंबाबत 'तो' प्रश्न विचारताच अजित पवार भडकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 15:29 IST

Baramati Lok Sabha: बारामतीतील मेळाव्यात केलेल्या आरोपांविषयी आज पुणे येथे पत्रकारांनी सविस्तर माहितीची विचारणा करताच अजित पवार काहीसे भडकल्याचं पाहायला मिळालं.

Ajit Pawar ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान पवार कुटुंबात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बारामती शहरात नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांविषयी आज पुणे येथे पत्रकारांनी सविस्तर माहितीसाठी विचारणा करताच अजित पवार काहीसे भडकल्याचं पाहायला मिळालं.

बारामतीच्या सभेत खळबळजनक गौप्यस्फोट करत अजित पवार म्हणाले होते की, "लोकसभेची उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून विजय शिवतारे यांना आलेले फोन त्यांनी मला दाखवले. ते फोन नंबर बघून मला इतकं वाईट वाटलं की कोणत्या पातळीवर राजकारण सुरू आहे. त्यांनी ते फोन नंबर मला दाखवले, एकनाथ शिंदेंना दाखवले  आणि देवेंद्र फडणवीसांनाही दाखवले. मी ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं, बाकी काही बघितलं नाही, त्यांच्याकडून माझ्या बाबतीत असं राजकारण सुरू आहे," असा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यामुळे हे फोन नंबर नक्की कोणाचे होते, याबाबतचा प्रश्न आज पुण्यात अजित पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नाने अजित पवारांचा पारा चांगलाच चढला आणि ते म्हणाले की, "तुम्ही मला मूर्ख समजू नका. मला जेवढं बोलायचं आहे, तेवढं मी सांगितलं आहे. घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं आहे, तेवढं मी बोललो आहे."

दरम्यान, अजित पवार यांनी विजय शिवतारेंना आलेल्या कथित फोन कॉल्सबद्दल गंभीर आरोप केले असले तरी ते फोन नक्की कुणाचे होते, हे सांगणं का टाळलं, याबाबत आता चर्चांना उधाण आलं आहे.

सुप्रिया सुळेंनी काय प्रत्युत्तर दिलं?

अजित पवारांनी विजय शिवतारेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटाचा रोख सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे असल्याने त्यांनी याबाबत नुकतंच स्पष्टीकरण दिलं होतं. "मला याची माहिती नाही. पण ते फोन करणारे कोण नेते आहेत, ते जाणून घ्यायला मलाही आवडेल," असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारbaramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Vijay Shivtareविजय शिवतारे