सहकारी बँकांमधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:10 IST2021-09-19T04:10:33+5:302021-09-19T04:10:33+5:30

बारामती येथे शनिवारी (दि. १८) एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, पुणे जिल्हा ...

Ajit Pawar to go to court against Centre's interference in co-operative banks | सहकारी बँकांमधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार : अजित पवार

सहकारी बँकांमधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार : अजित पवार

बारामती येथे शनिवारी (दि. १८) एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आम्ही उत्तम प्रकारे चालवली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या पाच बँकांमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश होतो. मात्र, सहकारी बँकांमधील अर्थव्यवस्थाच स्वत:च्या ताब्यात यावी, असा केंद्राचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये वकिलांमर्फत कायदेशीर सल्ला घेऊन सहकार विभागाच्या वतीने पुढे न्यायालयात कशा पद्धतीने जाता येईल, याबाबत राज्य सरकारची सल्लामसलत सुरू आहे.

कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर व तालुक्यात सुरू असणाऱ्या विविध विकासकामांची, तसेच प्रकल्पांची माहिती दिली. या दरम्यान मेडद येथे नव्याने बाजार समितीचा पेट्रोलपंप होत आहे. हा पेट्रोलपंप बारामती तालुका खरेदी-विक्री संघाकडे चालवण्यासाठी देण्यात आला आहे. या पेट्रोलपंपाच्या कामाचे काय झाले, काम कुठपर्यंत आले आहे, अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमादरम्यान केली. या वेळी एका अधिकाऱ्याने परवानगी राहिल्याचे सांगितले. यावर अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्याने धारेवर धरले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या जवळ बसतात. काहीही कारणं सांगता का? त्यांना भेटा, त्यांना अडचणी सांगा, तुम्ही माझ्या गतीने काम करा, असा सल्ला देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

जी मागणी केली तेच निवडणूक चिन्ह मिळेल...

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. हाच मुद्दा पडकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या विचाराचे पॅनेल निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. सोमेश्वरचा ३ हजार ३०० रूपयांचा दर हा राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये आहे. यापुढे कारखान्याची विस्तारवाढ करायची आहे. त्यामुळे आपल्या विचाराचे पॅनेल निवडून येणे गरजेचे आहे. दरम्यान, आपल्याला निवडणूकचिन्ह काय मिळाले आहे? याची विचारणा पवार यांनी केली, असता अजून चिन्ह मिळायचे आहे. असे उत्तर एका पदाधिकाऱ्याने दिले. आपली जी पहिली मागणी आहे तेच मिळेल आणि आता आपणच तेथे आहोत म्हणल्यावर जी मागणी केली आहे तेच चिन्ह मिळेल, अशी मिश्कील टिपण्णी अजित पवार यांनी केली.

Web Title: Ajit Pawar to go to court against Centre's interference in co-operative banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.