शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांनी केला ‘त्या’ वादाचा खुलासा; मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 08:33 IST

एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या कथित वादावर अजित पवारांचे स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राज्य सरकारमधील प्रमुख नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा रंगत आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाइल्सवर केल्या जाणाऱ्या सह्यांवरून वाद झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळत विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या कथित वादावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, ‘माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. आमच्यात कसलेही मतभेद नाहीत. सरकारमध्ये आम्ही सर्व जण एकोप्याने काम करत आहोत. 

मागे पण काही जणांनी चुकीची बातमी दिली की मी वेशभूषा आणि नाव बदलून दिल्लीला गेलो होतो. मी कशाला नाव बदलू? आई-वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं आणि मला माझ्या नावाचा अभिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी परवा जळगावच्या कार्यक्रमात एकत्र गेलो, मुंबईलाही एकत्र आलो. विरोधकांना काम उरले नसल्याने त्यांच्याकडून अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे,” असा पलटवार अजित पवारांनी केला आहे.

कॅबिनेट बैठकीत काय घडलं?

राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाइल्सवरील सह्यांवरून मोठा वाद झाल्याचे बोलले जात आहे. नगरविकास खात्याची फाइल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याने त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाइल्सवर मीही सह्या करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अजित पवार यांनी संघर्षाच्या चर्चा फेटाळल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळणार का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

जय पवार यांना उमेदवारी?

  • बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास फारसे इच्छुक नसल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगत आहे. 
  • अशातच पुण्यात अजित पवार यांनी मुलगा जय पवार यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘जय पवार यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असेल तर आमच्या पक्षाचे पार्लमेंट्री बोर्ड त्याबाबतचा निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे