शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

"चंद्रकांत पाटील मोठे, अजित पवार छोटे..", असं का म्हणाले अजित पवार ? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 11:06 IST

अजित पवार का असं म्हणाले ते जाणून घ्या...!

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वांनाच ठाऊक आहे. त्यानंतर आता जसजशी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे तसतसा या दोघातील राजकीय वाद वाढताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी अजित पवार हे कोरोना आढावा बैठकी वेळी विश्वासात घेत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. अजित पवारांनी त्यालादेखील प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोन्ही नेते आमने-सामने आले आहेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीप कंद यांचा मंगळवारी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना पुणे ग्रामीणमध्येच पोपटाचा प्राण असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता मी अतिशय छोटा माणूस असल्याचे ते म्हणाले. अजित पवार म्हणाले, "चंद्रकांत पाटील हे इतके मोठे आहेत की त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवारांसारख्या छोट्या व्यक्तीने टीका करणे बरोबर नाही. मोठ्या माणसांबद्दल मोठ्या माणसांनीच बोलावं. मी अतिशय छोटा माणूस असल्याचे सांगत त्यांनी यावर अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ? नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात क्रमांक एकचा पक्ष राहिला. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दुर्बीण लावून शोध घेण्याची गरज आहे. पोपटाचा प्राण पुणे ग्रामीण मध्येच आहे. त्यामुळे पक्षाने संकल्प करून बारामतीमधूनच आपण सुरुवात केली. बारामती लोकसभा निवडणूक अतिशय ताकदीने लढलो. त्यासाठी मी स्वतः बारामतीत घर घेऊन राहिलो. काही समीकरणे जुळून आली असती तर आज वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड