शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘नॉट रिचेबल’ अजित पवारांची बारामतीकरांना प्रतीक्षा; दिवाळीत भेटणारे दादा, यंदा गेले कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 06:15 IST

निवडणुकांच्या आधीही अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर असेच ‘नॉट रिचेबल’ झाले होते

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामती विधानसभा निवडणुकीत १ लाख ६५ हजार २६५ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळविले. बारामतीत प्रथमच सर्व विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा इतिहास यंदा घडला आहे. मात्र दिवाळीत आवर्जुन बारामतीकरांना भेटणारे अजितदादा ‘नॉट रिचेबल’ आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ च्या तुलनेत यंदा चांगली कामगिरी केल्याने बारामती हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. मात्र, या घडामोडींपासून अजित पवार प्रथमच अलिप्त दिसत आहेत.

सोमवारी दिवाळी पाडवा आहे. पाडव्यानिमित्त शरद पवार यांच्यासह अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, नेते येतात. सुमारे ७ ते ८ तास हा शुभेच्छा सोहळा पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानी रंगतो. दरवर्षी पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने दिवाळीत बारामतीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने शारदोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाही शारदोत्सवाला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपस्थित होत्या. मात्र, ते स्वत: उपस्थित नव्हते.

निवडणुकांच्या आधीही अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर असेच ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यानंतर शरद पवारांवर आरोप झाल्याने व्यथित होऊन राजीनामा दिल्याचे कारण त्यांनी सांगितले होते.थोरातांच्या भेटीवेळी अनुपस्थितराष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय जगताप यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील बारामतीला जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी सुप्रिया सुळे, रोहित पवार उपस्थित होते. पण अजित पवार यांची अनुपस्थिती बारामतीकरांना खटकल्याचे दिसून येते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस