अजिंक्य साळुंखे देशात पहिला
By Admin | Updated: June 8, 2015 05:38 IST2015-06-08T05:38:57+5:302015-06-08T05:38:57+5:30
सैन्य दलाच्या टेक्निकल ग्रॅज्युएट एंट्री स्कीम अंतर्गत झालेल्या निवडीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्टुमेंटेशन इंजिनिअर्सच्या अखिल भारतीय गुणवत्ता यादीत पुण्याचा अजिंक्य साळुंखे देशात पहिला आला आहे.

अजिंक्य साळुंखे देशात पहिला
पुणे : सैन्य दलाच्या टेक्निकल ग्रॅज्युएट एंट्री स्कीम अंतर्गत झालेल्या निवडीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्टुमेंटेशन इंजिनिअर्सच्या अखिल भारतीय गुणवत्ता यादीत पुण्याचा अजिंक्य साळुंखे देशात पहिला आला आहे.
टेक्निकल ग्रॅज्युएट एंट्री स्कीम अंतर्गत देशभरातून ६२ जागा इंजिनिअर्ससाठी असून, त्यातील फक्त दोन जागा इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्टुमेंटेशन शाखेकरीता असतात. देशभरातून ७ इन्स्टुमेंटेशन इंजिनिअर्सची यंदा निवड झाली आहे व त्यातील पहिल्या दोघांना रुजू होण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये अजिंक्यची पहिल्या क्रमांकावर निवड झाली आहे.
अजिक्य ७ जुलै ला डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अॅकेडमी येथे रुजू होईल. व एक वर्षाचे सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर पुढील वर्षी जूनमध्ये तो भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर रुजू होईल.