शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी अजय चंदनवाले यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 14:35 IST

मागील सात वर्षांच्या कारकीर्दीत डॉ. अजय चंदनवाले यांनी ससून रुग्णालयाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्दे‘सीएसआर’च्या माध्यमातून तब्बल ८५ कोटीहून अधिक निधी उभारुग्णालयामध्ये मुत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध केली

पुणे : ससून रुग्णालय व बी. जे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची यांची मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय व ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातापदी बदली करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा बदलीचा आदेश काढण्यात आला. ससूनमध्ये ते दि. १३ मे २०११ पासून अधिष्ठाता पदावर कार्यरत होते.डॉ. चंदनवाले यांनी मागील सात वर्षांच्या कारकीर्दीत ससून रुग्णालयाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. निधीच्या कमतरतेमुळे रुग्णांना चांगल्या सुविधा देणे शक्य होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कामांसाठी अध्यापक, डॉक्टर्स व सहकाऱ्यांच्या टीम्स तयार केल्या. सामाजिक दायित्व (सीएसआर), खासगी व लोकसहभाग (पीपीपी) या माध्यमातून निधी उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आतापर्यंत त्यांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून तब्बल ८५ कोटीहून अधिक निधी उभा करून रुग्णालयाला अत्याधुनिक स्वरूप दिले. त्यांनी रुग्णालयामध्ये मुत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध केली. लवकरच हृदय प्रत्यारोपणासाठीही मान्यता मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. महाराष्ट्रात अद्याप एकाही शासकीय रुग्णालयामध्ये प्रत्यारोपणाची सुविधा नाही. अवयदानामध्ये ससुन रुग्णालय आघाडीवर आहे. मात्र, त्यांच्या कारकीर्दीत ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम रखडले. या इमारतीचे २००९ पासून काम सुरू असून अद्याप पुर्ण झालेले नाही.  

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालय