प्रश्नोत्तरांची ऐशीतैशी
By Admin | Updated: September 18, 2014 00:04 IST2014-09-18T00:04:27+5:302014-09-18T00:04:27+5:30
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाबाबत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची दर महिन्याच्या मुख्यसभेत किमान अर्धा तास चर्चा होणो महापालिका अधिनियमानुसार बंधनकारक आहे.

प्रश्नोत्तरांची ऐशीतैशी
पुणो : शहराच्या विविध समस्यांबाबत तसेच महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाबाबत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची दर महिन्याच्या मुख्यसभेत किमान अर्धा तास चर्चा होणो महापालिका अधिनियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षात या प्रश्नोत्तराच्या तासालाच हरताळ फासण्यात येत असल्याचे समोर आले आहे. 2क्12 मध्ये महापालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर पालिकेच्या तब्बल 167 मुख्यसभा झाल्या असून, त्यात सुमारे 187 लेखी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील केवळ 31 प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे. तर 11 प्रश्न संबंधित सभासद अनुपस्थित असल्याने वगळण्यात आले आहेत. मनसेच्या नगरसेविका पुष्पा कनोजिया यांनी सप्टेंबर महिन्याच्या मुख्यसभेसाठी विचारलेल्या प्रश्नातून ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 44 नुसार, नगरसेवकांकडून मुख्यसभेत प्रश्न विचारले जातात, त्यात प्रशासनाच्या कामकाजापासून महापालिकेने घेतलेले निर्णय, ठराव, त्यांची अंमलबजावणी या संदर्भातील सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असतो. सभा सुरू झाल्यानंतर चर्चा होणो अपेक्षित असते. कनोजिया यांचा हा प्रश्न सप्टेंबर महिन्याच्या कार्यपत्रिकेवर असून, यावर तरी चर्चा होणार का, असा सवाल उपस्थितांतून केला जात आहे. (प्रतिनिधी)
4 मार्च 2क्12 मध्ये महापालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात आले. त्यानंतर गेल्या अडीच वर्षात सुमारे 167 मुख्यसभा झालेल्या आहेत. त्यात काही विशेष सभाही आहेत. या सभांसाठी सदस्यांनी तब्बल 187 लेखी प्रश्न विचारले होते.
4त्यातील केवळ 13 प्रश्नांवर आत्तार्पयत चर्चा करण्यात आल्याची माहिती नगरसचिव विभागाकडून देण्यात आली आहे. तर अद्यापही 51 प्रश्नांची माहिती प्रशासनाकडून संकलित करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले असून, सभासद उपस्थित नसल्याने 11 प्रश्न मुख्यसभेत वगळण्यात आल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.