शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

‘वर्क ऑर्डर’ सहीसाठी विमानाने राजस्थानला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 01:48 IST

शहराची सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत तातडीने २५ ई-बस खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली ‘वर्क ऑर्डर’ देण्याची घाई सत्ताधारी भाजपाने केली.

पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पीएमपीएमएलमार्फत तातडीने २५ ई-बस खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली ‘वर्क ऑर्डर’ देण्याची घाई सत्ताधारी भाजपाने केली. पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची सही घेण्यासाठी वर्क ऑर्डरची प्रत थेट विमानाने राजस्थानला पाठविण्यात आली. काही तासांत या वर्क आॅर्डरवर सही होऊन अखेर गुरुवारी (दि. ६) २५ ई-बस खरेदीची वर्क ऑर्डरदेखील देण्यात आली. सत्ताधारी भाजपाने एवढी घाई नक्की कशासाठी केली, असा सवाल काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केला आहे.शहरासाठी पहिल्या टप्प्यात २५ ई-बस खरेदी करण्यासाठी गुरुवारी (दि.६) संबंधित कंपनीला वर्क आॅर्डर देण्यात आली. यासाठी वर्क आॅर्डरवर गुंडे यांची सही घेणे आवश्यक होते. परंतु गुंडे सध्या राज्यस्थान येथे निवडणुकीच्या ड्युटीवर आहेत. बुधवारी संबंधित खाजगी कंपनीचा कर्मचारी आणि पीएमपीएमएलचा अधिकारी थेट विमानाने वर्क ऑर्डर घेऊन राज्यस्थानला गेले व सही घेतली, असे शिंदे यांनी सांगितले.>महागड्या दराने बस खरेदीपर्यावरणपूरक म्हणून तब्बल सव्वा कोटी रुपयांच्या ई-बस खरेदी करण्यात येत आहेत. भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बससाठी चायनीज कंपनीला एका बससाठी तब्बल ५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. सध्या शहरात सुरू पर्यावरणपूरक सीएनसी बस केवळ ३५ लाखांत येत असताना महागड्या बस भाड्याने घेतल्या आहेत. यामुळे आधीच तोट्यात असलेल्या पीएमपीएलमल गाळात घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Puneपुणे