पुण्याजवळ हवाई दलाचे विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित

By Admin | Updated: October 14, 2014 19:50 IST2014-10-14T19:29:37+5:302014-10-14T19:50:14+5:30

पुण्याजवळ हवाई दलाचे सुखोई विमान कोसळल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.

Air force plane collapses near Pune, pilot safe | पुण्याजवळ हवाई दलाचे विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित

पुण्याजवळ हवाई दलाचे विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १४ - पुण्याजवळ हवाई दलाचे सुखोई विमान कोसळल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. सुदैवाने विमानातील दोन्ही वैमानिकांनी बलूनच्या सहाय्याने उडी मारल्याने दोघेही सुखरुप बचावले आहेत.

मंगळवारी हवाई दलाच्या वैमानिकांचे प्रशिक्षण सुरु होते. याप्रशिक्षणा दरम्यान सुखोई हे विमान कोसळले. थेऊरजवळील कोलवडी गावातील साळुंखे मळ्यात हे विमान कोसळले. अपघातापूर्वी विमानातील दोन्ही वैमानिकांनी बलूनद्वारे उडी मारल्याने ते सुखरुप बचावले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच हवाई दलाचे हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले होते. हवाई दलानेही या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  

Web Title: Air force plane collapses near Pune, pilot safe