शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
2
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
3
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
4
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
5
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
6
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
7
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
8
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
9
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
10
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
11
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
12
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
13
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
14
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
15
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
16
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
17
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
18
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
19
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
20
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन

अवैध वाळूउपशाविरोधात हवा एल्गार

By admin | Updated: December 22, 2015 01:31 IST

वाळूव्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून भिगवण येथे घडलेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित वाळूमाफिया संजय

वाळूव्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून भिगवण येथे घडलेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित वाळूमाफिया संजय तनपुरे व त्याच्या तीन साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली शासन यंत्रणेकडून सुरू झाल्या आहेत. अवैध व बेसुमार वाळू उपशामुळे शासनाचा महसूल बुडतो. याहीपेक्षा त्यामुळे पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. निसर्गचक्र कोलमडत आहे. याचा विचार होऊन वाळूच्या अमर्याद उपशाविरुद्ध सर्वसामान्यांनी एकत्र आले पाहिजे.शासनाने अशा एक-दोघांवर कारवाई करण्याऐवजी, समस्यांच्या मुळाशी जाऊन ती समस्या खणून काढली पाहिजे. मुख्यत्वे महसूल विभागाला आणखी अधिकार देऊन, त्यांच्या संरक्षणासाठी ही उपाययोजना केली पाहिजे. इंदापूर तालुक्याचा विचार करता, भीमा व नीरा अशा दोन नद्यांमध्ये हा तालुका वसलेला आहे. या नद्यांचे काठ व संगमाकडील भागात गेल्या अनेक वर्षांपासून बेसुमार वाळूउपसा झाला आहे. सोलापूर, पुणे, नगर भागातील वाळूमाफिया बिनधास्तपणे वाळूचोरी करत आहेत. सोलापूर जिल्हयातील मोहोळ ते पुणे शहरापर्यंत सुमारे दोनशे किलोमीटर अंतरात त्यांची संघटित साखळी निर्माण झाली. मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या यंत्रणांच्या माध्यमातून ते एकमेकांच्या व पोलीस खाते, महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असतात. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे क्रमांक बहुतेक बनावट असतात, तर कधी चलाखी करून पुढे वेगळा व मागे वेगळा क्रमांक टाकलेला असतो. त्यातच पोलीस यंत्रणेची ‘कार्ड सिस्टीम’ वाळूचोरांचा कायद्याच्या कचाट्यापासून वाचवण्याचे काम करत असते. इंटरनेटवर आधारित संपर्क माध्यमांमुळे महसूल विभाग, पोलीस यंत्रणा मिळून कारवाई करणार असेल, तर ते काही क्षणांतच वाळूमाफियांना समजते. ते तातडीने सुरक्षित ठिकाणी जातात अथवा ज्या रस्त्यावर भरारी पथके आहेत, त्या रस्त्याकडे फिरकतच नाहीत. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मागे पुढे शस्त्रधारी वाळूमाफियांच्या आलिशान चारचाकी गाड्या असतात. डॉन, भाई असल्याची हवा डोक्यात भरलेले हे ‘भाई’ सोबत शस्त्र, गाठीला पैसा, राजकीय वरदहस्त असल्याने काहीही करावयास मागेपुढे बघत नाहीत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या भरारी पथकामध्ये असणारांकडे बरीचशी कागदपत्रे, शिक्के अन्य जास्तीत जास्त दोनेक पोलीस कर्मचारी असतात. ही मंडळी तशी जिवावर उदार होऊनच काम करत असतात. वरिष्ठांनी मानेवर दिलेल्या उद्दिष्टाच जोखड त्यांना कर्तव्य पार पाडायला भाग पाडत असते. जर कुणा एकाची भाईगिरी मेंदू सोडून वागली तर या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.