एड्सबाधित वाढतायत; पण जीवनमान उंचावतंय

By Admin | Updated: September 27, 2015 01:29 IST2015-09-27T01:29:29+5:302015-09-27T01:29:29+5:30

एड्स झाला म्हणजे आता हळूहळू मृत्यू या भीतिदायक संकल्पनेला आता छेद दिला जात असून, सातत्याने केले जाणारे समुपदेशन, जनजागृती व समयोचित औषधे यांमुळे एड्सबाधितांचे जीवनमान उंचावत

AIDS-affected growth; But lifting livelihoods | एड्सबाधित वाढतायत; पण जीवनमान उंचावतंय

एड्सबाधित वाढतायत; पण जीवनमान उंचावतंय

महेंद्र कांबळे ,  बारामती
एड्स झाला म्हणजे आता हळूहळू मृत्यू या भीतिदायक संकल्पनेला आता छेद दिला जात असून, सातत्याने केले जाणारे समुपदेशन, जनजागृती व समयोचित औषधे यांमुळे एड्सबाधितांचे जीवनमान उंचावत असल्याचे आशादायी चित्र बारामतीसारख्या शहरात समोर येत आहे. मात्र त्याच वेळी एड्सग्रस्तांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत असल्याची दुसरी बाजूही आहे.
एड्सविषयी सातत्याने जागृती करून एड्सबाधितांनाही सामान्य जीवन जगता यावे यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. एड्स जनजागृती, समुपदेशन, उपचारांसाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने एआरटी केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्रांद्वारे एचआयव्ही एड्स बाधित रुग्णांचे समुपदेशन केले जाते. त्याचबरोबर त्यांच्यावर औषधोपचार मोफत केले जातात. त्यामुळे या रोगाची लागण झालेल्या रुग्णांचे आयुष्यमान वाढलेले आहे. काही वर्षांपूर्वी अशा रुग्णांकडे तुच्छतेने पाहिले जात असे. आता कौटुंबिक समुपदेशन होत असल्यामुळे हे रुग्णदेखील औषधोपचारानंतर सामान्य जीवन जगू शकण्याची आशा निर्माण झाली आहे. एचआयव्ही एड्सची लागण झाल्याचे सुरुवातीच्या काळात निदर्शनास आल्यावर लगेचच त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, या रोगाचे निदान विंडो पिरियडमध्येच होणे गरजेचे असते. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. एआरटी केंद्रामुळे एचआयव्ही एड्स बाधित रुग्णाला दिलासा मिळाला आहे. बारामतीच्या केंद्रात स्थानिकांसह आसपासच्या फलटण, इंदापूर, दौंड, अकलूज या भागातून देखील रुग्ण येतात. त्यांची सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते.
पतीला या रोगाची लागण झाली असल्यास पत्नीचे देखील समुपदेशन केले जाते. त्यामुळे एआरटी केंद्रांचा फायदा रुग्णांना झाला आहे, असे केंद्राचे समन्वयक संदीप राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गरोदर मातांच्या बाळाचे संरक्षण...
गरोदर मातांनादेखील एचआयव्ही एड्सची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिच्या बाळाला गर्भात या रोगाची लागण होऊ नये, यासाठी काळजी घेतली जाते. आतापर्यंत १९हून अधिक बाळांचा या रोगापासून बचाव करण्यात आला आहे.
धुक्याची भर : या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दाट धुके पडत आहे. या परिसरातील शेती दाट धुक्याने व्यापून जात असून, नुकत्याच केलेल्या कांदा लागवड व कांदा रोपांना या धुक्याचा फटका बसत आहे. दावडी, निमगाव, खरपुडी, रेटवडी, मांजरेवाडी, मलघेवाडी, होलेवाडी या परिसरात दोन दिवसांपासून सकाळी दहा वाजेपर्यंत दाट धुके पडत आहे.
मागील सात वर्षांचा आढावा घेतला असता एड्सग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या दिसून येते. २००९ ते आॅगस्ट २०१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार ९८१ रुग्ण बारामती शहर, परिसरातील आहेत. त्यामध्ये ४८७ महिला या एचआयव्ही एड्सने बाधित आहेत तर ४९४ पुरुषांना या रोगाने ग्रासले आहे. यात अनेक मध्यमवर्गीय महिलांचाही समावेश आहे. वाहनचालक, रिक्षाचालकांबरोबरच शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्यांमध्ये एचआयव्ही एड्सची लागण झाल्याचे यापूर्वी दिसून येत होते.

Web Title: AIDS-affected growth; But lifting livelihoods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.