आमदाबादची ग्रामपंचायत निवडणूक ३० वर्षांनंतर प्रथमच बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST2021-01-08T04:29:40+5:302021-01-08T04:29:40+5:30
यामध्ये घोडगंगाचे उपाध्यक्ष रंगनाथ थोरात, माजी संचालक पाडुरंग थोरात, माजी सरपंच योगेश थोरात, उद्योजक आबा पवार, माजी उपसरपंच संदीप ...

आमदाबादची ग्रामपंचायत निवडणूक ३० वर्षांनंतर प्रथमच बिनविरोध
यामध्ये घोडगंगाचे उपाध्यक्ष रंगनाथ थोरात, माजी संचालक पाडुरंग थोरात, माजी सरपंच योगेश थोरात, उद्योजक आबा पवार, माजी उपसरपंच संदीप जाधव, माजी चेअरमन अशोक माशेरे, माजी सरपंच प्रकाश थोरात, पोपटराव जाधव, रामभाऊ माशेरे, संजय थोरात, राजेंद्र माशेरे यांनी पुढाकार घेत तडजोड करीत निवडणूक बिनविरोध केली. उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
या निवडणुकीत बिनविरोध झालेले सदस्य :
स्नेहल योगेश थोरात, सोनाली रेवनाथ थोरात, प्रदीप भाऊसाहेब साळवे, कांताराम बजाबा नऱ्हे, अनिता पोपट घुले, सविता अशोक माशेरे, लिलाबाई जयसिंग पवार, सखाराम छबा बरडे, राजेंद्र बाळासाहेब शिंदे, दिलीपराव वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांनी आम्हाला निवडणूक बिनविरोध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गावची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे गावातील मतभेद मिटणार असून गावच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे माजी सरपंच योगेश थोरात व उद्योजक आबा पवार यांनी सांगितले.