आरोग्य संशोधनासाठी एएफएमसी - पुणे विद्यापीठात करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST2021-05-28T04:08:54+5:302021-05-28T04:08:54+5:30
गुरुवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. ...

आरोग्य संशोधनासाठी एएफएमसी - पुणे विद्यापीठात करार
गुरुवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, एएफएमसीचे ब्रिगेडियर इनचार्ज अजय श्रीवास्तव, लेफ्टनंट कर्नल ए. डब्ल्यू. काशीफ, विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, डॉ. सुरेश गोसावी, प्रा. दिनेश अंबळनेरकर आदी या वेळी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने यापूर्वी महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठाबरोबरही सामंजस्य करार केला आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्व प्राध्यापक, संशोधक व प्रत्यक्ष काम करणारे डॉक्टर एकत्र आले, तर नक्कीच या क्षेत्रात मोठी कामगिरी होईल, असा विश्वास डॉ. नितीन करमळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
या करारानुसार अध्यापक, संशोधन, प्रयोगशाळा, शैक्षणिक कार्यक्रम, माहिती आदींचे आदानप्रदान होणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना इंटर्नशिपचीही संधी उपलब्ध होणार आहे.
------