दौंड तालुक्यातील शेतकरी आक्रमक

By Admin | Updated: January 16, 2015 03:06 IST2015-01-15T23:47:37+5:302015-01-16T03:06:26+5:30

जर येथील शेतक-याना भामा आसखेड धरणाच्या पाण्याचा काहीही उपयोग होत नसेल तर त्यांच्या जमिनीवरील धरणग्रस्तांसाठी शेरे काढण्याचा सरकारचा अध्यादेश आहे. असे असताना याबाबत

Agrakak farmer in Daund taluka | दौंड तालुक्यातील शेतकरी आक्रमक

दौंड तालुक्यातील शेतकरी आक्रमक

राहू : जर येथील शेतक-याना भामा आसखेड धरणाच्या पाण्याचा काहीही उपयोग होत नसेल तर त्यांच्या जमिनीवरील धरणग्रस्तांसाठी शेरे काढण्याचा सरकारचा अध्यादेश आहे. असे असताना याबाबत
काहीही कार्यवाही होत नाही. तसेच या जमिनीचे वाटप गुंंजवणी धरग्रस्तांसाठी होत असल्याने राहू बेट परिसरातील
शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. येथे ताबा घेण्यासाठी धरणग्रस्त आल्यास त्यांना आमच्या रोषाला सामोरे जावे लागले असा इशारा त्यांनी दिला आहे.
राहूबेट (दौंड) परिसरातील ९ गावांतील सुमारे १८ हजार एकर क्षेत्रावर ‘भामा-आसखेड धरणग्रस्तांसाठी राखीव क्षेत्र’ असा, तर काही ठिकाणी सात-बाऱ्याच्या मालकी हक्कात जिल्हाधिकारी नाव लागले आहे. या जमिनी मूळ मालकांना मिळाव्यात, यासाठी दौंड तालुका भामा-आसखेड संपादित क्षेत्र शेतकरी कृती समिती व शिरूर, हवेली शेतकरी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी आंदोलने , बैठका झाल्या.
शासनाने भामा-आसखेड धरणाचे पाणी दौंड, शिरूर, हवेली या तालुक्यांतील शेतकऱ्यांना जाणार नसेल व या भागात कालवा होत नसेल, तर या शेतकऱ्यांच्या जमिनी भामा-आसखेड धरणग्रस्तांसाठी राखीव ठेवणे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे व त्यांच्यावर अन्यायकारक आहे, असा निर्णय घेऊन त्या जमिनी मूळ मालकांना देण्याबाबत अध्यादेश (आरपीए-३४१२/प्र.क्र.१0१/र-४ महसूल व वन विभाग मंत्रालय
मुंबई-३२, दि. १/९/२0१४ ) काढला. परंतु, याबाबत अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नाही. या अध्यादेशाची अंमलबजावणी कधी होणार, याच्या प्रतीक्षेत बाधित शेतकरी आहेत.
या सर्व प्रक्रिया
विधानसभा निवडणुकीच्या
तोंडावर झाल्या होत्या. नवीन सरकार सत्तेत येऊन तीन महिने पूर्ण झाले; परंतु त्याबाबत ठोस पाऊल उचलेले दिसत नाही. त्यानंतर हिवाळी अधिवेशनही पार पडले. काहीही निर्णय घेतला नसल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ते आता आंदोलनाची भाषा बोलू लागले आहेत.
आमचे क्षेत्र लाभक्षेत्रात
येत नाही. तसेच येथे कालवाही
केला नाही. त्यामुळे आमच्या जमीनीवर धरणग्रस्तांसाठी राखीव असा शेरा टाकण्याचा अधिकार शासनास नाही. त्यात आरक्षीत जमीनीचे वाटप धरणग्रस्तांसाठी सुरू महसूल विभागाचे अधिकारी करीत आहेत. हे चुकीचे आहे. हे वाटप झाले असले तरी जे लोक ताब्यासाठी येतील त्या ठिकाणी रक्तपात झाला तरी आंम्ही मागे हटणार नाही असा इशारा पिलाण वाडी येथील शेतकरी महेंद्र झुरूंगे यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Agrakak farmer in Daund taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.