अगोती नं. १ गावातील १००० वृक्षांचा वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:15 IST2021-08-25T04:15:20+5:302021-08-25T04:15:20+5:30
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने, तसेच सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे ...

अगोती नं. १ गावातील १००० वृक्षांचा वाढदिवस साजरा
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने, तसेच सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे यांच्या संकल्पनेतून व पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली, इंदापूर तालुक्यातील अगोती नं.१ येथे लावलेल्या १००० वृक्षलागवडीचा प्रथम वाढदिवस इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, व्यापारी संघटनेचे प्रमुख नंदकुमार गुजर, तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंदशेठ शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार ( दि. २४ ) रोजी करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन नगरपरिषदेचे नगराध्यक्षा अंकिता शहा बोलत होत्या.
यावेळी सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे यांना पत्रकार संघाच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे, सिने अभिनेते शिवकुमार गुणवरे, तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सोमनाथ ढोले, तालुका संघटक भीमराव आरडे, बाळासाहेब कवळे, मनोज साबळे, गोकुळ टांकसाळे, भीमसेन उबाळे, रोटरी क्लबचे प्रमोद भंडारी, जयश्री पवार, गावचे ग्रामसेवक निलेवाड यांच्यासह गावकरी उपस्थित होते. आभार गोकुळ टांकसाळे यांनी मानले.
इंदापूर तालुक्यातील अगोती नं. १ येथे महाराष्ट्र राज्य राज्य मराठी पत्रकार संघाने लावलेल्या १००० वृक्षांचा वाढदिवस साजरा करताना मान्यवर.