शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

...कारखान्यावर दिवाळी तरी कशी गोड लागणार, ऊसतोडणी कामगारांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 00:36 IST

कशाची दिवाळी..... कशाचं काय.. पहाटे चारला उठायचं भाकरी थापायच्या..आणि भाकर चटणी फडक्यात गुंडाळून निघायचं ऊस तोडायला... लहान पोरं गावाकडे आणि आम्ही कारखान्यावर दिवाळी तरी कशी गोड लागणार...

सोमेश्वरनगर  - कशाची दिवाळी..... कशाचं काय.. पहाटे चारला उठायचं भाकरी थापायच्या..आणि भाकर चटणी फडक्यात गुंडाळून निघायचं ऊस तोडायला... लहान पोरं गावाकडे आणि आम्ही कारखान्यावर दिवाळी तरी कशी गोड लागणार, अशा शब्दांत तांबाराजुरी (ता. पाटोदा, जि. बीड) येथील सविता आणि सोमनाथ तांबे या दांपत्याने त्यांची अगतिकता व्यक्त केली.मंत्री समितीने या वर्षी २० आॅक्टोबरला साखर कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे बीड, नगर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून लाखोंच्या संख्येने येणारे ऊसतोडणी कामगार दसरा झाल्यावरच साखर कारखान्यांवर दाखल झाले. त्यामुळे या कामगारांची यंदाची दिवाळी उसाच्या फडातच गेली. सविता तांबे पुढे सांगतात, ‘पहाटे उठल्यापासून राब राब राबायचं, रात्रीचे अकरा वाजतात झोपायला.दिवाळी करायला सवड हाय कुणाला?’ऊसतोडणी कामगारांना दिवाळी सणाचं काहीच कौतुक नाही. लहान मुलं इथं तर थोडी मोठी पोरं गावाकडे. त्यांना ठेवून दिवाळीचा घास कडूच लागणार ना? दोन-चार लाडू केले तर केले नाहीतर बाजरीची भाकरी आणि झुणका हाटून खायचा.. हा त्यांचा रोजचाच दिनक्रम.गावाकडून ऊस तोडायला येताना मुकादमाकडून उचल घ्यायची. सहा महिने राब राब राबून पोटाला चिमटा काढून उचल फेडायची. घेतलेल्या उचलीमधून पोरांची शिक्षणं आणि लग्न करायची. दिवसभर तोडलेल्या उसाचे वाढे विकून रोजचं तेल-मीठ भागवायचं,असेच चित्र बहुतांश ऊसतोडणी कामगारांचे आहे.कारखाना कार्यक्षेत्रात धूमधडाक्यात दिवाळी साजरी होत असताना ऊसतोडणी कामगारांच्या झोपडीत अजून अंधारच आहे. या वर्षी अनेक ऊसतोडणी कामगारांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी म्हाताऱ्या आईवडिलांच्या भरवशावर गावकडंच ठेवलं आहे. गावाकडे सध्या प्यायला पाणी नाही.टठत्यामुळे बहुतांश कामगारांनी गाव सोडून साखर कारखान्यावर येणे पसंत केले आहे.कामगारांची दिवाळी अळणीच...कारखाना परिसरामध्ये दिवाळी साजरी होत असताना ऊसतोडणी कामगारांच्या झोपडीत मात्र दिवाळीचा दिवा पेटलाच नाही. घरात गोडधोड नाही, मुलांना कपडे नाहीत की फटाके नाही... नशिबात आहे ते फक्त रोज राब राब राबणं असे ऊसतोडणी कामगारांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे