आगरोधक यंत्रणा जुनीच
By Admin | Updated: May 19, 2015 01:04 IST2015-05-19T01:04:23+5:302015-05-19T01:04:23+5:30
हजारो लिटरचा साठा असणाऱ्या शहरातील ६० पैकी ५० पेट्रोलपंपांची नियमित अग्निप्रतिबंधक तपासणीच होत नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
आगरोधक यंत्रणा जुनीच
पेट्रोलपंपांवरील स्थिती : ६० पैकी ५० पेट्रोलपंपांची तपासणीच नाही
पेट्रोल आणि डिझेल अशा ज्वलनशील पदार्थांचा हजारो लिटरचा साठा असणाऱ्या शहरातील ६० पैकी ५० पेट्रोलपंपांची नियमित अग्निप्रतिबंधक तपासणीच होत नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. पेट्रोल कंपन्यांकडून केवळ एचपी क्लबमध्ये समाविष्ट असलेल्या १० पेट्रोलपंपांच्या सुरक्षेकडेच लक्ष दिले जात असून, इतर पंपांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
नागपूर येथील एक पेट्रोलपंप आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मोठ्या दुर्घटनेला सामोरे जाण्याची घटना नुकतीच घडली. यापार्श्वभूमीवर पुणे शहरातील पेट्रोलपंपांच्या सुरक्षेचा आढावा घेतला असता, अग्निप्रतिबंधक यंत्रणेतील अनेक त्रुटी उजेडात आल्या आहेत. पेट्रोलपंपांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचे निकष पेट्रोल कंट्रोल बोर्डाकडून निश्चित करून देण्यात आले आहेत.
पेट्रोल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून केवळ एचपी क्लबमधील १० पेट्रोलपंपांची दर तीन महिन्यांनी तपासणी केली जाते. शहरातील उर्वरित ५० पेट्रोलपंपांची मात्र कोणतीही तपासणी होत नाही. पेट्रोलपंपावर फायर एक्स्टिंग्युशर, रेतीच्या बादल्या, पाण्याचे ड्रम ठेवणे बंधनकारक आहे. फायर एक्स्टिंग्युशर वापर झाला किंवा नाही झाला तरी ते दर वर्षी बदलणे बंधनकारक आहे. पंपांवरील कर्मचाऱ्यांना ते वापरण्याचे प्रशिक्षण देणे, तसेच
त्यांच्याकडून मॉकड्रील करून घेण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, एचपी क्लबमधील पेट्रोलपंपांचा अपवाद वगळता बहुतांश पेट्रोलपंपांवर या निकषांचे काटेकोरपणे पालन
होत नाही.
अनेक पेट्रोलपंपांवरील फायर एक्स्टिंग्युशर आऊट डेटेड झाले असून, ते कुठल्यातरी कोपऱ्यात पडून आहेत. त्याचा वापर करण्याचे ज्ञान खूपच कमी कर्मचाऱ्यांना आहे.
एनओसीचे
नूतनीकरणच नाही
४पेट्रोलपंप सुरू झाल्यानंतर सुरूवातीला एकदाच अग्निशमन विभागाकडून त्यांना ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे लागते, त्यानंतर मात्र त्याचे नूतनीकरण करण्याची कोणतीही तरतूद फायर अॅक्टमध्ये नाही.
४मॉल, मल्टिफ्लेक्स, थिएटर, मंगल कार्यालये यांना दर वर्षी नूतनीकरण करावे लागत असताना ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा करणाऱ्या
पेट्रोलपंपांना एनओसीचे
नूतनीकरण करण्याचे कोणतेही
बंधन नाही.
एच क्लबमधील पेट्रोलपंपांची कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून दर ३ महिन्यांनी तपासणी केली जाते, तसेच इतर पेट्रोलपंपांची वर्षातून एकदा तपासणी होते. पेट्रोलपंपांवरील फायर एक्स्टिंग्युशर दर वर्षी नियमितपणे बदलले जाते. कर्मचाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.’’
- अली दारूवाला,
प्रवक्ते, आॅल इंडिया पेट्रोल-डिझेल डीलर असोसिएशन
पेट्रोलपंपचालकांनी त्यांना ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देताना ठरवून दिलेल्या निकषांचे पालन करणे बंधनकारक आहे. पेट्रोलपंपावर आग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. पेट्रोलपंपांची तपासणी करताना त्या निकषांचे पालन केले नसल्याचे आढळून आल्यास त्यांची एनओसी रद्द करण्याची कारवाई केली जाईल.
- प्रशांत रणपिसे,
प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी