शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या नावाने एजंटगिरी करणाऱ्यांनी घातला २० लाखांना गंडा

By विवेक भुसे | Updated: January 4, 2024 19:59 IST

मानवाधिकार कार्यकर्त्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : आर्थिक गुन्ह्यात अटक होऊ नये, म्हणून मध्यस्थी करुन पोलिसांना देण्यासाठी २० लाख रुपये घेऊन एका व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यासह दोघांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ईक्बाल ईब्राहिम शेख (रा. नईम सोसायटी, कौसरबाग, कोंढवा) आणि साजीद बासीत शेख (रा. भाग्योदयनगर, कोंढवा) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत एका ४१ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पतीविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दाखल होता. त्यात ईक्बाल शेख हा मध्यस्थ म्हणून काम करत होता. त्यांच्या पतीवर कारवाई होऊ नये, म्हणून शेखने ९ लाख रुपये घेतले हेाते. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये त्याने फिर्यादींच्या पतीला फोन करुन तुम्हाला पोलिस कधीही अटक करु शकतात, असे सांगितले व उरलेले १ लाख रुपये मागितले. तेव्हा त्यांनी चार दिवसात पैसे देतो, असे सांगितले. त्यानंतर शेख वेळोवेळी गुन्हा दाखल होण्याची भिती दाखवून पोलिसांना पैसे देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळत होता. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी फिर्यादींच्या पतीला पोलिस घेऊन गेले. पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर तो वेळोवेळी त्यांना जामीन करुन देतो, असे सांगत होता. फिर्यादींच्या पतीला अटक झाल्यानंतर त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा शेख याने साजीद शेख मार्फत फिर्यादी यांना चार लाख रुपये परत देत असल्याचे भासविले. परंतु, प्रत्यक्ष पैसे परत केले नाही. दरम्यान एप्रिल २०२३ मध्ये फिर्यादी यांच्या पतीला जामीन मिळाला. फिर्यादी यांनी ईक्बाल शेख याच्याकडे दिलेले २० लाख रुपये परत मागितले. तेव्हा त्याने शिवीगाळ करुन धमक्या दिल्या. फिर्यादी यांनी त्याचे सर्व कॉल रेकॉर्ड केले होते. फिर्यादी यांनी ईक्बाल शेख याचा शोध घेऊन त्याच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी काही महिला व पुरुषांनी गोंधळ घातल्याने पोलिसांनी सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. तेथे ईक्बाल शेख याने १५ ते २० दिवसात पैसे परत करणार असल्याचे सांगितले. तरीही त्याने अद्याप पैसे न दिल्याने शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक संदीप भोसले तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी