साठ वर्षापासून डोंगरपायथ्याशी जीव मुठीत धरून राहतोय
By Admin | Updated: August 5, 2014 23:16 IST2014-08-05T23:16:28+5:302014-08-05T23:16:28+5:30
बेंढारवाडी (ता. आंबेगाव) ही आदिवासी लोकवस्ती डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रत तीव्र डोंगरउताराच्या पायथ्याशी वसली आहे.

साठ वर्षापासून डोंगरपायथ्याशी जीव मुठीत धरून राहतोय
डिंभे : बेंढारवाडी (ता. आंबेगाव) ही आदिवासी लोकवस्ती डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रत तीव्र डोंगरउताराच्या पायथ्याशी वसली आहे. धरण पाणलोट क्षेत्रपासून शंभर मीटरच्या आतील लोकवस्तीला पुनर्वसनाचा लाभ मिळाला असला तरी बेंढारवाडी येथील अनेक घरे आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. सुमारे साठ वर्षापासून आम्ही डोंगरपायथ्याशी जीव मुठीत धरून राहतोय असे येथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रत पश्चिमेस तीव्र डोंगर उताराच्या पायथ्याशी हे गाव वसले आहे. खालून धरणाच्या पाण्याचा रेटा तर वरच्या बाजूस तीव्र उताराचा डोंगर. यामुळे या आदिवासी वस्तीचे पुनर्वसन व्हावे अशी येथील ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. महाराष्ट्र शासनाने या मागणीचा विचार करून या वस्तीच्या पुनर्वसनासाठी सुमारे 5 कोटींचा निधी मंजूर करून आणला. विषेश बाब म्हणून मंजूर झालेल्या या निधीचा उपयोग खरे तर संपूर्ण बेंढारवाडीचे पुनर्वसन होणो अपेक्षित होते. मात्र असे न होता, या निधीतून केवळ 1क्क् मीटरच्या आतील घरांचे पुनर्वसन केले. पाच वर्षापूर्वी बेंढारवाडी येथे पावसाळ्यात जवळपास दोन कि.मी. लांब व तीन फूट खोल एवढी भेग पडून जमीन खचली होती. अतिवृष्टीमुळे हा भाग खचल्यास खालच्या व वरच्या बाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.
बेंढारवाडी ही डिंभे धरणात अंशत: बाधित झालेली वस्ती आहे. येथील अनेक शेतक:यांच्या जमिनी शिल्लक आहेत. या जमिनी कसून ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, गरज म्हणून सुमारे 6क् वर्षापूर्वी बांधलेली डोंगर पायथ्यावरील घरे वर्षानुवर्षे जमिनीची धूप झाल्याने आज धोकादायक झाली आहेत. (वार्ताहर)
‘‘आमच्या वस्तीतील अनेक घरे डोंगरउतारावर बांधली आहेत. माङो घर हे तीव्र डोंगरउताराच्या खाली आहे. दोन वर्षापूर्वी गावाचा विचार करून सडक काढण्यासाठी मी माङया जमिनीतून जागा दिली. या वर्षी रस्ता करण्यासाठी घराच्या वरील बाजूचा डोंगर मोठय़ा प्रमाणात तोडल्याने सध्या मोठे दगड रस्त्यावर पडून डोंगर खचून घरांस धोका निर्माण झाला आहे.
- गोविंद भवारी, रहिवाशी
‘‘पुनर्वसन विभागाकडून आमच्या घरांचा सव्र्हे झाला होता. मात्र 1क्क् मीटरचे कारण सांगून आमच्या घरांचे पुनर्वसन करण्याचे टाळले.
- दुला बेंढारी, रहिवाशी