शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

चिमुरड्याच्या भविष्याचा विचार करून दीड वर्षानंतर संसार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 20:05 IST

त्या मुलाला आईवडिलांचे प्रेम, एकत्र सहवास मिळणे आवश्यक असल्याचे समुपदेशनातून दोघांना पटवून देण्यात आल्यानंतर, आनंद आणि सविताचा (नावे बदलली आहेत) विचार बदलला.  

ठळक मुद्देसमुपदेशनाने सोडविला प्रश्न : संसाराची घडी पुन्हा सुस्थितीत

पुणे : अखेर समुपदेशनाने त्या दोघांमधील तंटा मिटला. विसंवादाची जागा संवादाने घेतली. शेवटी त्या चिमुरड्याकडे पाहत, त्याच्या भविष्यासाठी दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला; मात्र या एकत्र येण्याला दीड वर्षाचा काळ जाऊ द्यावा लागला. अटी-तटीच्या वेळेवर येऊन ठेपलेला त्यांचा संसार पुन्हा आनंदाने सुरू झाला.    त्या मुलाला आईवडिलांचे प्रेम, एकत्र सहवास मिळणे आवश्यक असल्याचे समुपदेशनातून दोघांना पटवून देण्यात आल्यानंतर, आनंद आणि सविताचा (नावे बदलली आहेत) विचार बदलला.२७ मे २०१३ रोजी दोघांचा विवाह झाला. आनंद खासगी नोकरी करतो. सविता शासकीय सेवेत आहे. कामानिमित्ताने तिची वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली होत असते.  दोघांना एक गोंडस बाळ आहे. घरगुती कारणावरून दोघांत वाद निर्माण झाले. वाद इतके टोकाला गेले की, त्यामुळे ते दोघे जानेवारी 2017 पासून विभक्त राहू लागले. मुलाचा ताबा सविताकडे होता.  मे 2017 मध्ये तिने घटस्फोट मिळावा, यासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर तिने आनंदला बाळास भेटू देण्यास विरोध केला. त्यानंतर तिचे समुपदेशन करण्यात आले. त्या वेळी तिने त्याला बाळास भेटण्यास परवानगी दिली. दरम्यान, कौटुंबिक न्यायालयात दाखल दाव्याच्या तारखा पडू लागल्या;  मात्र नोकरी करत असल्याने हजर राहण्यास दोघांना जमत नव्हते. त्यामुळे त्यांनी एकत्र येत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला.दोघेही कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात  २१ ऑगस्ट २०१८ ला हजर राहिले. त्या वेळी या केसमध्ये समुपदेशन केल्यास दोघे पुन्हा एकत्रित राहू शकता, असे अभ्यास केल्यानंतर काफरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आणि विवाह समुपदेशक विद्या चव्हाण यांनी दोघांचे समुपदेशन केले.  याविषयी दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे म्हणाले की, कौटुंबिक न्यायालय केवळ घटस्फोट देणारे नाही. तर कित्येक वेळेला मोडकळीस आलेली नाती इथे पुन्हा जोडली जातात. याचेच हे उदाहरण आहे. या घटनेतील यशस्वी समुपदेशनामुळे बाळाला आईवडिलांचा एकत्र सहवास मिळणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नCourtन्यायालय