शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर पीएमपीएमएल वाहक-चालकांची प्रवाशांवर अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:30 PM

तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर, काही दिवसांतच या शिस्तीला हरताळ फासला जाऊ लागला आहे. काही वाहक व चालक निर्धास्त झाले असून, पुन्हा बेशिस्त सुरू झाल्याचा अनुभव प्रवाशांना येऊ लागला आहे.

ठळक मुद्देवर्तन केले जात असून, ‘कुणाकडेही तक्रार करा’ असे म्हणण्यापर्यंत चालक-वाहकांची मजलचालक-वाहकांना पुन्हा शिस्त लावण्यासाठी तुकाराम मुंढेच परत यावेत, प्रवाशांची अपेक्षा

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर, पुन्हा बेशिस्त वाढू लागल्याचा अनुभव प्रवाशांना येऊ लागला आहे. काही चालक-वाहकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन केले जात असून, ‘कुणाकडेही तक्रार करा’ असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. मात्र, तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर, काही दिवसांतच या शिस्तीला हरताळ फासला जाऊ लागला आहे. काही वाहक व चालक निर्धास्त झाले असून, पुन्हा बेशिस्त सुरू झाल्याचा अनुभव प्रवाशांना येऊ लागला आहे. रविवारी कोथरूड बसस्थानकात एका बस (एमएच १४ सीडब्ल्यु १४९२) मध्ये प्रवाशांना हा अनुभव आला. स्थानकात अडीच वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना बसमध्ये २० मिनिटांहून अधिक काळ एकाच जागेवर बसावे लागले. याबाबत बसमधील एका ज्येष्ठ महिला प्रवाशांनी चालकाला हटकले असता, त्याने ‘आधीच्या बसमध्ये का गेला नाही, झोपला होता का,’ असे म्हणून हात झटकले; तसेच यावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ‘कुणाकडे तक्रार करायची ते करा. बसमध्ये नंबर आहेत,’ अशा भाषेत त्याने प्रवाशांनाच सुनावले. त्यामुळे बेशिस्त चालक-वाहकांना पुन्हा शिस्त लावण्यासाठी तुकाराम मुंढेच परत यावेत, अशी अपेक्षा प्रवाशांनी या वेळी व्यक्त केली. हा बसचालक ठेकेदाराकडील असल्याचे समजते.मुंढे यांनी पीएमपीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर, पहिल्या दिवसापासून सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारला होता. पहिल्याच दिवशी त्यांनी कामाच्या वेळेत बदल करून त्याची सुरुवात केली. कामाच्या वेळा पाळण्याबरोबरच अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील वावर, चालक व वाहकांचे प्रवाशांशी संभाषण, त्यांचे वर्तन याबाबतीत पावले उचलली होती. बेशिस्त वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लगेचच कारवाई होत असल्याने शिस्त पाळली जात होती. त्यामुळे बस वेळेवर मार्गावर आणणे, प्रवाशांशी चांगले बोलणे याचा अनुभव बसमधील प्रवाशांना येत होता.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलtukaram mundheतुकाराम मुंढेPuneपुणे