जिल्ह्यातील 78 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद
By Admin | Updated: September 29, 2014 23:28 IST2014-09-29T23:28:33+5:302014-09-29T23:28:33+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 21 मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 561 उमेदवारांपैकी 78 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत,

जिल्ह्यातील 78 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद
>पुणो : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 21 मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 561 उमेदवारांपैकी 78 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत, तर 482 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. भोसरीतील एका उमेदवाराच्या अर्जावरील निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला असून, त्यावर मंगळवारी निर्णय घेण्यात येणार आहे. फॉर्म अपूर्ण भरणो, प्रतिज्ञापत्र सादर न करणो, एबी फॉर्म जमा न करणो आदी कारणांसाठी उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची सोमवारी उमेदवारांच्या प्रतिनिधीसमक्ष छाननी करण्यात आली आहे. काही उमेदवारांच्या अर्जावर प्रतिनिधींनी आक्षेप घेतले. त्यानुसार त्याची शहानिशा करण्यात आली.
शहरातील शिवाजीनगर मतदारसंघामध्ये 23 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्या सर्व उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध ठरविण्यात आले. कोथरूड मतदारसंघामध्ये 15 उमेदवारांपैकी 14 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, एकाचा अर्ज बाद झाला. खडकवासला मतदारसंघामध्ये 2क् उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर सर्वाधिक 12 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. एबी फॉर्म जमा न करणो, अपूर्ण अर्ज भरणो, प्रतिज्ञापत्र न जोडणो या कारणांसाठी अर्ज बाद झाले. पर्वती मतदारसंघातून 22 पैकी 21 अर्ज बाद ठरले तर एक अर्ज बाद झाला. हडपसर मतदारसंघात 29 पैकी 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. पुणो कॅन्टोमेंट मतदारसंघातून 23 पैकी 19 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. कसबा पेठ मतदार संघातून 24 पैकी 22 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. पर्वती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुभाष जगताप तसेच भोसरीमधील शिवसेनेच्या उमेवादवार सुलभा उबाळे यांच्या अर्जावर आक्षेप नोंदविण्यात आला होता. निवडणुक अधिका:यांनी जगताप यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळून लावत त्यांचा अर्ज वैध ठरविला. उबाळे यांच्या प्रतिज्ञापत्र संबंधित कागदपत्रंबाबत म्हणणो सादर करण्यास त्यांना उद्यार्पयतची मुदत देण्यात आली आहे त्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल.
हडपसर मतदारसंघातून हिंदुराष्ट्र सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रसिका धनंजय देसाई यांचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला. (प्रतिनिधी)
मोहितेंचा अर्ज अखेर वैध
खेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या अर्जावर भाजपचे शरद बुट्टे यांनी आक्षेप घेतला होता, मात्र निवडणूक अधिका:यांनी छाननीनंतर त्यांचा अर्ज वैध ठरविला.
सर्वाधिक उमेदवार इंदापुरात
4इंदापूर मतदारसंघातून सर्वाधिक 44 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर सर्वात कमी 12 उमेदवार आंबेगाव मतदारसंघात आहेत.
4उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 1 ऑक्टोबर्पयत आहे. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होऊ शकेल. एका मतदानयंत्रवर 15 उमेदवारांची नावे असणार आहेत.
4त्यामुळे अनेक मतदारसंघामध्ये 2 ते 3 मतदानयंत्रे जोडावी लागणार आहे. प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.