राजू इनामदारपुणे: महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर अभियंता शाम ढवळे यांनी आपल्या छंदाला स्वखर्चातून संग्रहालयाचे रूप दिले आहे. अनेक वर्षे ठिकठिकाणी भ्रमंती करून मिळवलेला खजिना 'कलामंडल' या संग्रहालयात प्रदर्शनीय झाला आहे.पौड गावाच्या अलिकडे दरवडे नावाचे गाव आहे. तिथल्या मिस्टिप वसाहतीच्या थोडे पुढे हे दुमजली कलामंडल उभे राहिले आहे. जमीन ढवळे यांच्याच मालकीची, सेवेत असताना केलेली बचत, निवृत्त होताना मिळालेले काही वेतन खर्च करून ढवळे यांनी ही स्वप्नपुर्ती केली आहे. ५ गुंठे जागेवर बांधकाम केले आहे. तिथे पुण्यातल्या जुन्या वाड्यांमधील लाकडी कोरीव कामांच्या खिडक्यांपासून ते कसबा पेठेतील पेशवाईतल्या घरांच्या जोत्याच्या दगडांसह अनेकविध वस्तू मांडून ठेवल्या आहेत. त्यातल्या बहुतेक ढवळे यांनी स्वतः फिरून जमवलेल्या आहेत, तर काही त्यांना भेट म्हणून मिळालेल्या आहेत.महापालिकेच्या बांधकाम विभागात काम करत असले तरी ढवळे मनाने पुराणवास्तू आणि इतिहासकालिन वस्तूंमध्येच रमलेले असायचे. ते स्वतः उत्तम चित्रकार, शिल्पकार आहेत.
निवृत्तीनंतर 'त्यांनी' उभे केले स्वखर्चातून 'कलामंडल'; छंदांचे संग्रहालयात रुपांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 12:09 IST
अवलिया व स्वच्छंदी माणसांना निवृत्तीनंतर काय करावे हा प्रश्नच पडत नाही.. !
निवृत्तीनंतर 'त्यांनी' उभे केले स्वखर्चातून 'कलामंडल'; छंदांचे संग्रहालयात रुपांतर
ठळक मुद्देवैयक्तिक असले तरी हे संग्रहालय सर्वांसाठी खुले ठेवणार