विश्रांतीनंतर पाऊस सक्रिय
By Admin | Updated: July 17, 2015 02:09 IST2015-07-17T02:09:01+5:302015-07-17T02:09:01+5:30
आठ-दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात गुरुवारी पाऊस पुन्हा सक्रिय झाला. अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहराच्या मध्यवर्ती भागात

विश्रांतीनंतर पाऊस सक्रिय
पुणे : आठ-दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात गुरुवारी पाऊस पुन्हा सक्रिय झाला. अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहराच्या मध्यवर्ती भागात ०.२ मिमी तर लोहगाव येथे १ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
गेल्या १५ दिवसांत एक -दोन दिवसच शहरात पाऊस पडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान होते. सकाळी ११च्या सुमारास अचानकपणे पावसास सुरुवात झाली. काही वेळातच पावसाचा जोर वाढला पण लगेचच तो गायबही झाला.
उपनगरांमध्येही अशीच स्थिती होती. लोहगाव, येरवडा, कल्याणीनगर, वडगाव धायरी, वडगाव शेरी, खडकी, दापोडी आदी भागांमध्ये पाऊस पडला.
कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक सरींचा शिडकावा होत असतानाच पुढील ७२ तासांसाठी कोकण आणि गोव्याला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला.