शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीच्या भेटीनंतर माऊलींच्या पालखीचा पुणे जिल्हयात प्रवेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 20:45 IST

पांडुरंगाच्या दर्शनानंतर आज गुरुवारी संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याने परतीच्या प्रवासात पुणे जिल्ह्यात प्रवेश केला.

ठळक मुद्देपरतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान दुपारी अडीच वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याने वाल्हे गावाकडे मुक्कामासाठी मार्गक्रमण

नीरा : आषाढी वारीतील एकादशीच्या पांडुरंगाच्या दर्शनानंतर आज गुरुवारी संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याने परतीच्या प्रवासात पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे कालचा मुक्काम होता. आज (गुरुवारी) सकाळी ९ वाजता पालखी सोहळा नीरा नदीकिनारी आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माऊलींच्या पादुका सोहळाप्रमुख डॉ. अजित कुलकर्णी यांनी सोहळामालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे स्नानासाठी दिल्या. आरफळकर, दिनकर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘माऊली-माऊली’च्या जयघोषात प्रसिद्ध दत्तघाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले. स्नान सुरू असताना सोहळ्यासोबत आलेले पुरुष विणेकरी व तुळस घेतलेल्या महिलांनी रथाच्या पुढे व मागे दोन रांगा केल्या होत्या. पादुका पुन्हा रथाकडे आल्यावर प्रथम रथापुढील व नंतर रथामागील विणेकऱ्यांना माऊलींच्या पादुकांचे दर्शन देण्यात आले. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. परतीच्या प्रवासातील हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर माऊलींच्या सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील नीरा शहरात प्रवेश केला.छत्रपती शिवाजी चौकात नीरेच्या सरपंच दिव्या पवार, सदस्य अनिल चव्हाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष किरण जेधे यांनी स्वागत केले. अहिल्याबाई होळकर चौकातून नीरेतील युवकांनी रथातील पालखी खांद्यावर घेऊन येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ठेवली. या वेळी नीरेसह परिसरातील भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रांगा लावून दर्शन घेतले. दुपारी अडीच वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याने वाल्हे गावाकडे मुक्कामासाठी मार्गक्रमण केले.०००

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpurपंढरपूर