दीड महिन्यानंतरही टँँकर मिळेना
By Admin | Updated: April 29, 2017 04:01 IST2017-04-29T04:01:27+5:302017-04-29T04:01:27+5:30
वाढत्या उन्हाच्या झळामुळे तालुक्यातील पाण्याचे झरे, ओढेनाले आटले असून, विहिरींचे पाणी कमी झाल्याने भोर तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई

दीड महिन्यानंतरही टँँकर मिळेना
भोर : वाढत्या उन्हाच्या झळामुळे तालुक्यातील पाण्याचे झरे, ओढेनाले आटले असून, विहिरींचे पाणी कमी झाल्याने भोर तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई सुरु झाली आहे. भोर पंचायत समितीकडे टँकर मागणीचे प्रस्ताव सादर करुन दीड महिना झाल्यानंतर एका टँॅकरला मंजुरी मिळाली आहे. मात्र तो सुरु करण्यात आला नाही. पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडून टोलवाटोलवी सुरु आहे. टँकर सुरु करा; अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
भाटघर व नीरा देवघर या दोन्ही धरणभागातील गावांत वीसगाव महुडे खोऱ्यात व महामार्गावरील काही गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. १० गावे व १३ वाड्यावस्त्यांनी टँॅकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर केले होते. त्यापैकी सर्वच गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी शिरवली हि.मा. व चौधरीवस्ती यांच्यासाठी एका टँॅकरला मंजुरी मिळाली आहे. त्याला आठवडा झाला मात्र टँकर पुरविण्याचे टेंडर मिळालेल्या संस्थेने अद्याप टँकर सुरु केलेला नाही. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे टँॅकर मंजूर होऊनही नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत.
पाणीटंचाई असलेल्या शिरवली हि.मा. चौधरीवस्ती, मोरवाडीचे पाचलिंगे, म्हसरबुची धनगरवस्ती, भुतोंडे, डेरेची खिळदेववाडी, गृहिणी, गुढे निवंगण, पसुरेची धनगरवस्ती, जयतपाड हुंबेवस्ती, दुर्गाडीची मानटवस्ती, अभेपुरी रायरीची धारांबेवाडी, खुलशी, वरोडी खुर्द, वरोडी बुदुक, वरोडी डायमुख, शिळींब अशिंपीची उंबार्डेवाडी, शिरगावची पातरटाकेवस्ती, डेहेणची जळकेवाडी या १० गावांनी व १३ वाडयावस्त्यांनी टँॅकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीत दीड महिन्यापूर्वीच सादर केले आहेत. महामार्गावरील शिंदेवाडी व ससेवाडी येथे ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
दरम्यान, शिरवली हि.मा, भुतोंडे, पातरटेकवाडी (शिरगाव), गुढे निवंगण, मानटवस्ती (दुर्गाडी), हुंबेवस्ती (जयतपाड), जळकेवाडी (डेहेण), राजीवडी, शिळींब, खिळदेवाडी (डेरे), खुलशी, धनगरवस्ती (म्हसरबु), गृहिणी या गावांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले आहेत. त्यापैकी शिरवली हि.मा. व चौधरीवस्ती या गाव वाडीला एका टँकरला म्ांजुरी मिळाली आहे. त्याला आठवडा होऊनही संस्थेच्या हालगर्जीपणामुळे अद्याप टॅकर सुरु झाला नाही. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टँॅकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांसह जनावरांचे पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे. (वार्ताहर)