शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिन्यानंतरही पोलीस ठाण्यांच्या हद्दीची फेररचना कागदावरच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 14:10 IST

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येवून एक महिना उलटला तरीही अजून हे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पडून असल्याने हद्दीची फेररचना कागदावरच राहिली आहे़

ठळक मुद्देपुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे

पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कामकाज १५ आॅगस्टपासून सुरु झाले़. त्याच्याबरोबरच पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीची फेररचना करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते़ परंतु, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येवून एक महिना उलटला तरीही अजून हे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पडून असल्याने हद्दीची फेररचना कागदावरच राहिली आहे़. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील पोलीस ठाणी पिंपरी आयुक्तालयात व पुणे शहर पोलीस दलाकडे पुणे शहरातील पोलीस ठाणी अशी रचना ठरविण्यात आली आहे़. त्याचबरोबर परिसरातील भागही दोन्ही पोलीस आयुक्तालयात घेण्याचे निश्चित करण्यात आले़. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात चाकण व तळेगाव दाभाडे पोलीस ठाणी समाविष्ट करण्यात आली़. मात्र, पुणे शहर पोलीस आयुक्तालयात अजूनही लोणी काळभोर आणि लोणीकंद ही पोलीस ठाणी समाविष्ट केली गेली नाही़. पूर्वीच्या हिंजवडी पोलीस ठाण्यात मुंबई - बंगळुरू महामार्गाचा काही भाग येतो़ या पोलीस ठाण्याची हद्द अगदी पुण्यातील चांदणी चौकापासून सुरु होते़. आधीच हिंजवडीला असलेली वाहतूकीची समस्या पाहता चांदणी चौक परिसरातील नागरिकांना आपल्या समस्यांसाठी थेट हिंजवडी गाठावी लागते़. पुणे शहरात येणारा हा भाग नवीन बाणेर पोलीस ठाण्याची स्थापना करुन त्यात समाविष्ट करावा, असा प्रस्ताव अनेक महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठविण्यात आला आहे़. परंतु, त्याला अजूनही मान्यता मिळाली नाही़. त्यामुळे आजही चांदणी चौक परिसरातील नागरिकांना हिंजवडी पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ येत आहे़. पुणे पोलीस आयुक्तालयाने आपल्या कडील पोलीस ठाण्यांची रचना करताना चतु:श्रृंगी पोलीस ठाणे हे परिमंडळ ४ मध्ये समाविष्ट केले आहे़. या परिमंडळाच्या उपायुक्तांचे कार्यालय येरवडा येथे आहे़. भोगौलिक सलगता लक्षात घेता चतु:श्रृंगी पोलीस ठाणे हे परिमंडळ १ मध्ये असायला हवे होते़. त्यामुळे बाणेर, औंध, पाषाण भागातील नागरिकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा असेल तर त्यांना थेट येरवड्याला शहराच्या दुसऱ्या टोकाला जावे लागणार आहे़. ..................पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे़. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर अंमलबजावणी करण्यात येईल़.शेषराव सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड