पावसाळा आल्यावर प्रशासनाला जाग

By Admin | Updated: May 20, 2015 01:02 IST2015-05-20T01:02:21+5:302015-05-20T01:02:21+5:30

पावसाळा तोंडावर असताना, पुणेकरांंना खड्डेमुक्तीचे आश्वासन देण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या खर्चाचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे.

After the monsoon, the administration has awakened | पावसाळा आल्यावर प्रशासनाला जाग

पावसाळा आल्यावर प्रशासनाला जाग

पुणे : पावसाळा तोंडावर असताना, पुणेकरांंना खड्डेमुक्तीचे आश्वासन देण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या खर्चाचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ३0 मे पर्यंत हडपसर, बिबवेवाडी, सहकार, कोंढवा, घोले रस्ता आणि औंध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
शहरात बेसुमार रस्ते खोदाई झालेली आहे. हे रस्ते अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. अनेक रस्ते खराब झाले असून, मोठ्या पावसानंतर त्यावर खड्डे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने पावसाळा दोन-तीन महिन्यांंवर असतानाच या रस्त्यांची दुरुस्ती तसेच पुनर्डांबरीकरण करणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाला जाग आली आहे. आज हडपसर, कोंढवा-वानवडी आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ९१ लाख तर, औंध व घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीसाठी ८७ लाख रुपयांच्या कामांसाठी प्रस्ताव ठेवण्यात आले होते. पावसाळा जवळ आल्याने तातडीची बाब म्हणून प्रस्तावांना मान्यता दिल्याचे अश्विनी कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

३0 मेपर्यंत पूर्ण करणार कामे
पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे प्रशासनाकडून घाईगडबडीने ठेवली असून, ती पूर्ण करण्यासाठी ३0 मेपर्यंतची मुदत क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या पालिकेच्या मे महिन्याच्या मुख्यसभेत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. मान्यतेनंतर प्रत्यक्षात वर्कआॅर्डर देण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे ३0 मेपर्यंत ही कामे पूर्ण होणार का, तसेच घाईगडबडीने पूर्ण केलेल्या या कामाची गुणवत्ता काय राहणार, याबाबत प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.

नगर रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादनास मान्यता
नगर रस्ता रुंदीकरणासाठी वेकफिल्ड आणि सिद्धार्थनगर येथील जागेचे भूसंपादन करण्यासाठी ३ कोटी ५३ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या शिवाय, कात्रज स.नं. १८ येथील डीपी रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

Web Title: After the monsoon, the administration has awakened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.