शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'लग्नानंतर पतीला लागले दारूचे व्यसन, त्रासाला कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 15:40 IST

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देघरभाडे भरण्यासाठी साठवलेले पैसे दारूत उडविलेल्याने विवाहितेने केली आत्महत्या

पुणे : प्रेमविवाहानंतर पतीला दारुचे व्यसन लागल्याने संसारात वादावादी सुरु झाली. घरभाडे, वीज बिल भरण्यासाठी साठवलेले पैसे पतीने गुपचूप दारु पिण्यामध्ये उडवल्याने असह्य होऊन पत्नीने पेटवून घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

अंकिता कुंदन कांबळे (वय २५, रा. उंड्री) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. कुंदन कांबळे (वय २९, रा. उंड्री) असे पतीचे नाव आहे. याप्रकरणी अंकिताचे वडिल व्यंकट जाधव (वय ५२, रा. कृपानगर, उंड्री) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

कुंदन आणि अंकिता यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यांना एक दीड वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी कुंदनला दारुचे व्यसन लागले. कुंदन दररोज दारुच्या आहारी जाऊ लागला. त्यामुळे घरातील सामानासाठी अंकिताला पैसे साठवून ठेवावे लागत होते. घरभाडे, वीज बिल भरण्यासाठी अंकिता पैसे साठवून  ते कुंदनपासून लपवून ठेवत असे. मात्र, १२ एप्रिल रोजी अंकिताने घरभाडे व वीज बिलासाठी ठेवलेले पेसे कुंदनने गुपचुप घेतले. त्या पैशातून तो दारु पिऊन घरी आला. त्याचा राग आल्याने अंकिता आणि कुंदन यांच्यात वादावादी झाली. त्या रागाच्या भरात अंकिता हिने अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना २४ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता तिचा मृत्यु झाला. कोंढवा पोलिसांनी कुंदन कांबळेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी