शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चार तासांनंतर सिंहगड रोडवरील वाहतूक सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:50 IST

पोलिसांनी सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक वळविल्याने शहरातील मध्यवस्तीमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

पुणे : पर्वती येथे मुठा कालवा फुटल्याने दांडेकर पूल परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. दांडेकर पूल वसाहत आणि सिंहगड रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते खबरदरीचा उपाय म्हणून पोलिसांनी सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक वळविल्याने शहरातील मध्यवस्तीमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, पाणी ओसरु लागल्याने चार तासानंतर दुपार नंतर सिंहगड रोडवरील वाहतूक सुरु करण्यात आली. 

दांडेकर पुलाजवळ गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास कालवा फुटल्याने त्याचे पाणी वेगाने वाहून सिंहगड रस्त्यावर आले. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलापासून सिंहगडकडे जाणारी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. दांडेकर पुलाच्या चौकातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने हा चौकातील वाहतूकही बंद पडली. त्याचा परिणाम होऊन सारसबागेकडून येणारी पूर्णपणे थांबली. त्यामुळे वाहनांच्या रांगा सारसबागेपर्यंत गेल्या. पाठोपाठ मित्रमंडळ चौक, पर्वती दर्शन या भागात वाहतूक कोंडी झाली.

पाण्याचा वेग सुरुवातीच्या काळात जास्त असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. त्यात निलायम चौकाकडून दांडेकर पुलाकडे जाणारा रस्ता, अभिनव चौकातून टिळक रस्त्याकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. परिणामी पर्यायी रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सदाशिवपेठ, बाजीराव रस्त्याकडील शुक्रवारपेठेचा भाग, टिळक रस्ता, बाजीराव रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मध्यवस्तीतील प्रमुख रस्ते बंद झाल्याने त्याचा ताण डेक्कन, जंगली महाराज रस्ता, कर्वेरस्ता परिसरातील वाहतुकीवर झाला. त्यामुळे येथेही वाहनकोंडी झाली होती. तसेच या रस्त्यांना पुरक असलेल्या रस्त्यावरील वाहतुकीचा वेगही मंदावला होता.  

तसेच, सेनादत्त पोलीस चौकी, शास्त्री रस्त्यावरही वाहनांची रांग लागली होती. कालव्यातील पाणी बंद केल्यानंतर काही तास वाहतुक कोंडीचा कालवा सुरु होता. दुपारी दोन नंतर सिंहगड रोडवरील वाहतूक सुरु झाल्यानंतर ही कोंडी फुटून वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.

टॅग्स :mula muthaमुळा मुठाPuneपुणेfloodपूरTrafficवाहतूक कोंडी