शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हुंडाबळीच्या शहानिशेनंतरच सासरच्या व्यक्तींची नावे प्रकरणात येणार ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 19:30 IST

जोपर्यंत संबंधित नातेवाईकाचा त्या प्रकरणात सहभाग स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याला आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने आहे.

ठळक मुद्देतक्रारीच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबतीलदोष कोणाचा आहे यानुसार संबंधितांना अटक होणे गरजेचे

पुणे : कुटुंबियांचा सहभाग असल्याची शहानिशा होत नाही तोपर्यंत त्यांची नावे हुंडाबळीसारख्या प्रकरणात घेण्यात येऊ नयेत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे कौटुंबिक वाद आणि हुंडाबळी सारख्याप्रकरणात नाहक अडकवल्या जाणा-या सासरच्या मंडळींना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. जोपर्यंत संबंधित नातेवाईकाचा त्या प्रकरणात सहभाग स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याला आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने नमूद केले आहे. चूक नसताना सासरच्या व्यक्तींना होणारा त्रास या माध्यमातून कमी होईल. तसेच तक्रारीच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबतील, असा विश्वास शहरातील कौटुंबिक न्यायालयात प्रक्टिस करणा-या वकिलांनी व्यक्त केला आहे. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी हा गुन्हेगार नसतो. या कायद्यांतर्गंत तक्रार झाल्यानंतर समुपदेश करावे आणि त्यानंतर एफआयआर दाखल करायची अशी प्रक्रिया आहे. पूर्वी एफआयआर नोंदवून मग चौकशी व्हायची. त्यामुळे दोषी नसलेल्या व्यक्तींची नाहक बदनामी होता. या निर्णयामुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना खोट्या आरोपामुळे त्रास होणार नाही.अ‍ॅड. आम्रपाली कांबळे - कसबे ---उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करते. सासरच्या व्यक्तींना त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी दोषी नसतानाही त्यांची नावे घेतली होत आहेत, असे काही प्रकरणांमध्ये दिसून आले. या निर्णयामुळे गुन्ह्यातील सत्यता तपासल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. पक्षकारांचा खरेपणा सिद्ध होत नाही तोपर्यंत याप्रकरणात नातेवाईकांचा सहभाग करणे चुकीचे होते.अ‍ॅड. सुप्रिया डोंगरे -------या प्रकरणांमध्ये नणंद अनेकदा टार्गेट केली जाते. सासू सासरे देखील लिस्टवर असतात. नणंद परदेशात रहायला असली तरी तिचे नाव तक्रारीमध्ये देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. नणंदेने फोनवरून किंवा घरी आल्यानंतर भावाच्या संसारात लक्ष घातले असेल तर तिच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र यासर्वांची सत्यता तपासणे गरजेचे आहे. अ‍ॅड. सुनिता जंगम ---सुडाची भावना म्हणून कुंटुंबातील व्यक्तींची नावे घेवून त्यांना या प्रकरणात गोवण्यात येत. कुटुंबियांना नाहक त्रास होत असल्याने पती अशावेळी पत्नीचे म्हणने मान्य करतो. त्यामुळे दबावतंत्र म्हणून देखील याचा वापर होत. त्या प्रकारांना या निकालामुळे लगाम बसेल. अ‍ॅड. अभय शिरसट---गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक होवू नये किंवा खोट्या गुन्ह्यात अडकले जावू नये, यासाठी प्रयत्न करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे घटना नेमकी काय आहे. त्यात दोष कोणाचा आहे, यानुसार संबंधितांना अटक होणे गरजेचे आहे. या निकालातून ते साध्य होईल. अ‍ॅड. अभिजीत निंबक र  

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयmarriageलग्न