शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अठरा वर्षे पूर्ण होताच तब्बल अडीच हजार जणांनी नोंदविले नाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:59 IST

आगामी लोकसभा निवडणूकीत त्यांना पहिल्यांदाच मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे.

ठळक मुद्देआॅक्टोबर महिन्यातील प्रत्येक रविवारी सर्व मतदान केंद्रावर विशेष मोहीम दिन राबविण्यात येणार

पुणे : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या मतदार नोंदणी मोहिमेत १८ ते २० वयोगटातील युवकांमध्ये नाव नोंदविण्याचा उत्साह दिसून येत आहे. रविवारी (दि. ७) आणि मंगळवारी (दि. ९) राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहीमेत २ हजार ४५० अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत त्यांना पहिल्यांदाच मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे. या दोन्ही मोहीमेत मिळून ६ हजार २२५ मतदारांनी नावे नोंदविली आहेत.  निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार येत्या ३० आॅक्टोबरपर्यंत छायाचित्रावर आधारित मतदार यादी अद्ययावत करण्यात येत आहे. ज्या मतदारांची १ जानेवारी २०१९ रोजी पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार नोंदणी करता येणार आहे. आॅक्टोबर महिन्यातील प्रत्येक रविवारी सर्व मतदान केंद्रावर विशेष मोहीम दिन राबविण्यात येणार आहे. या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केंद्रावर उपस्थित असतील. या वेळी मतदार नोंदणी अर्ज वाटप करण्याबरोबरच ते योग्य कागदपत्रे सादर करुन स्वीकारण्यात येतील. त्याचप्रमाणे १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या वाढविण्यासाठी जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये आॅक्टोबर महिन्यातील प्रत्येक मंगळवारी विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी (दि. ७) जिल्ह्यात झालेल्या मतदार नोंदणीत १८ ते १९ वयोगटातील १ हजार ५९० व्यक्तींनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज दिला. तर, १९ वयोगटावरील ३ हजार ८०६ व्यक्तींनी अर्ज भरले आहेत. अशा ५ हजार ३९६ व्यक्तींनी मतदार नोंदणीचे अर्ज भरले आहेत. मंगळवारी (दि. ९) जिल्ह्यातील महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत १८ ते १९ वयोगटातील ६२९ आणि त्या वरील वयोगाटतील २३१ अशा ८६० विद्यार्थ्यांनी अर्ज दिले आहेत. वयाची अठरा वर्षे पूर्ण होताच २ हजार ४५० युवकांनी नाव नोंदणी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकStudentविद्यार्थी