दिवाळीनंतर शहरात कच:याचे साम्राज्य
By Admin | Updated: October 26, 2014 00:08 IST2014-10-26T00:08:56+5:302014-10-26T00:08:56+5:30
गेल्या चार दिवसांपासून दिवाळीच्या सुटय़ा आहेत. त्यामुळे अधिकारी नसल्याने कचरा विभागातील कर्मचा:यांनीही दांडय़ा मारल्या आहेत.

दिवाळीनंतर शहरात कच:याचे साम्राज्य
पुणो : गेल्या चार दिवसांपासून दिवाळीच्या सुटय़ा आहेत. त्यामुळे अधिकारी नसल्याने कचरा विभागातील कर्मचा:यांनीही दांडय़ा मारल्या आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील विविध पेठांतील कचराकुंडय़ा ओसंडून वाहत आहेत. शहरभर कच:याचे साम्राज्य पसरले असून, फटाक्याचा कचरा उचलला न गेल्याने आगी लागण्याच्या घटना घडत आहेत.
शहरात रोज सुमारे 16क्क् टन कचरा निर्माण होतो. मात्र, दिवाळी सणानिमित्त कच:यात 2क् ते 3क् टक्के वाढ अचानक होते. लक्ष्मीपूजन व पाडव्या दिवशी रोज 17क्क् ते 18क्क् टन कचरा निर्माण झाला. मात्र, याच काळात महापालिकेच्या सुटय़ा आल्या आहेत. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच सलग पाच सुटय़ा आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी सुटीवर असल्याने घनकचरा विभागातील कर्मचारी व मुकादमांनी दांडय़ा मारल्या आहेत. त्यामुळे शहरातील विविध भागांत आणि प्रामुख्याने पेठांमधील कचराकुंडय़ा ओसंडून वाहत आहेत. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
दांडेकर पुलाजवळ कचरा कुंडय़ांचा अभाव असल्याने रस्त्याच्या बाजूला कचरा टाकला जात आहे. नदीकाठ व कॅनॉलमध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. फटाक्याच्या कच:यामुळे राजेंद्रनगर भागातील कचराकुंडय़ांना आगी लागण्याच्या घटना घडल्या.
त्या ठिकाणी अग्निशामक यंत्रणोद्वारे ही आग विझविण्यात आली. त्यामुळे पुढील दुर्घटना घडली नाही. मात्र, कचराकुंडय़ाच्या बाजूला कचरा साचल्याने परिसरात अस्वच्छता व दरुगधी वाढली
आहे.
त्यामुळे नागरिक त्रस्त असून, अधिकारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)
कचरावेचकांच्या सुट्टय़ा
4दिवाळीच्या काळात एका बाजूला घराघरांत कचरा वाढला आहे. मात्र, त्या काळात अनेक ठिकाणी कचरावेचकांनी दांडी मारली. त्यामुळे नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता व दरुगधींचे साम्राज्य पसरले आहे.
आरोग्याला धोका
4गेल्या चार दिवसांपासून दिवाळी सणाचा कचरा कुंडय़ामध्ये साचला आहे. कचरा उचलण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कमी पडत आहे. अगोदरच कचरा साचला असताना पाऊस पडला. त्यामुळे दरुगधी वाढली असून, रोगराईची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साचलेल्या कच-याच्या ठिकाणी औषध फवारणीची मागणी नागरिक करीत आहेत.
दिवाळी सणाच्या निमित्ताने सुका कचरा वाढलेला आहे. साधारणात रोज 25क् ते 3क्क् टन कच-याची भर पडली आहे. महापालिकेला सुट्टी असलीतरी कर्मचा-यांकडून सुट्टी न घेता कचरा उचलण्याचे काम सुरू आहे.
- नितीन शिंदे, कनिष्ठ अभियंता