शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बुलेट ट्रेनच्या उलट-सुलट चर्चेनंतर आता ‘हायपरलुप ट्रेन’ची भर; वेगाच्यादृष्टीने पर्याय चांगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 12:43 IST

पुणे व मुंबईदरम्यान सेवा सुरू करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ‘हायपरलुप ट्रेन’ची चाचपणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देबुलेट ट्रेनला सर्व विरोधी पक्षांसह वाहतूकतज्ज्ञ तसेच इतर घटकांकडून विरोधपुणे-मुंबई अंतर २० मिनिटांत पार करता यावे, यादृष्टीने ‘पीएमआरडीए’ने एका कंपनीशी केला करार संकल्पना चांगली असली तरी वास्तवाचा विचार केल्यास सध्या याची गरज नसल्याचे तज्ज्ञांचे मत

पुणे : मुबंई व अहमदाबाददरम्यान प्रस्तावित असलेल्या बुलेट ट्रेनच्या उपयुक्ततेवरून उलट-सुलट चर्चा सुरू असताना आता त्यात ‘हायपरलुप ट्रेन’ची भर पडली आहे. पुणे व मुंबईदरम्यान ही सेवा सुरू करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) चाचपणी सुरू केली आहे. मात्र, व्यावहारिकदृष्टीने याही पर्यायावर तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. वेगाच्यादृष्टीने हा पर्याय चांगला असला तरी खर्च व इतर संलग्न सुविधा उभारण्याबाबत वास्तववादी विचार करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार भारतातही वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई आणि अहमदाबाददरम्यान बुलेट ट्रेनच्या कामाची सुरुवात करण्यात आली. पुण्यातही अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, बुलेट ट्रेनला सर्व विरोधी पक्षांसह वाहतूकतज्ज्ञ तसेच इतर घटकांकडून विरोध झाला. या प्रकल्पाला येणारा खर्च तसेच सध्याची रेल्वे वाहतुकीची स्थिती यावरून या बुलेट ट्रेनच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आता ‘हायपरलुप’ची चर्चा सुरू झाली आहे. पुणे व मुंबईदरम्यानचे अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे, यादृष्टीने ‘पीएमआरडीए’ने एका कंपनीशी करार केला आहे. ही संकल्पना चांगली असली तरी वास्तवाचा विचार केल्यास सध्या याची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. प्रवासी वाहतुकीसाठी ‘हायपरलुप’हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात येण्यासाठी सिद्ध झाले आहे. त्यामुळे तांत्रिकबाबतीत काहीच अडचण येणार नाही. मात्र, व्यावसायिक उपयुक्ततेबाबत सांगता येणार नाही. हा पर्याय सर्वसामान्यांना परवडणार नाही. ही चैनीची गोष्ट असून आपली गरज वेगळी आहे. पुण्या-मुंबईतील श्रीमंत लोकांनाच ही सेवा परवडेल. त्यासाठी शासनाने या पर्यायाचा सर्व बाजूने विचार करून प्रत्यक्षात आणायला हवी. ही सेवा आणताना त्याला संलग्न इतर प्रवासी वाहतूकसेवाही असणे आवश्यक आहे. अन्यथा २० मिनिटांत मुंबईत पोहोचल्यानंतर पुढे आपल्या कार्यालयात जाण्यासाठी एक तास लागणार असेल तर ‘हायपरलुप’चा काहीच फायदा होणार नाही, याचा विचार करून पुणे व मुंबईतील दोन ठिकाणे निश्चित करणे आवश्यक आहे. 

 

‘स्विच चॅलेंज’ पद्धतीने राबवू शकतो : गित्तेपुणे : राज्य शासनाने नुकतीच ‘स्विच चॅलेंज’ ही नवीन पॉलिसी मंजूर केली आहे. यामध्ये शासकीय विभाग स्विच चॅलेंज पद्धतीने एखादा प्रकल्प उभा करू शकते. यासाठी एखाद्या खासगी कंपनीने सर्व तयारी करून शासनाला प्रस्ताव दिल्यानंतर शासन त्याचे स्विच चॅलेंज जाहीर करते व अन्य कोणती कंपनी हा प्रकल्प करू शकते का, याची तपासणी करते. त्यानंतर संबंधित शासकीय विभाग व खासगी कंपनी तो प्रकल्प उभा करतो. यामुळे हायपरलूप हा प्रकल्पदेखील पीएमआरडीए याच पॉलिसीनुसार करू शकते, अशी माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेलिस येथील ‘हायपरलुप वन’ या कंपनीच्या वतीने पूर्वव्यवहार्यता अभ्यास (प्री-फिजिबिलिटी स्टडी) करण्यात येणार आहे. यामध्ये हायपरलुप वाहतूक कोणत्या मार्गामध्ये होऊ शकते, किती अंतर असू शकते, प्रवासी किती असतील, डोंगराळ भाग, येणाºया अडचणी आदी सर्व बाबीत येत्या सहा आठवड्यात सर्वे करण्यात येणार असल्याची माहिती गित्ते यांनी दिली. हायपरलुप ही वाहतूक व्यवस्था मास मेट्रो अथवा अन्य कोणत्याही वाहतुकीपेक्षा कमी खर्चामध्ये होऊ शकते. मोठ्या शहरामध्ये हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरतो.पीएमआरडीएच्या वतीने प्रामुख्याने पुणे-मुंबई, मुंबई एअरपोर्ट, नवी मुंबई, पुणे-पुरंदर विमानतळ होऊ शकते. यामध्ये अभ्यास करताना पुणे आणि मुंबई विभागातील सर्वच मार्गांचा अभ्यास करणार, त्यानंतर सर्वांत उपयुक्त मार्ग काढले जातील, असे गित्ते यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सहा आठवड्यांनंतर हायपरलुपबाबत प्राथमिक अहवाल तयार होईल, असे गित्ते यांनी स्पष्ट केले. 

बुलेट ट्रेन, हाय स्पीड रेल ट्रान्झिट, मोनोरेल, मॅगलेव्ह अशा विविध प्रवासी वाहतूक पर्यायांमध्ये ‘हायपरलुप’ आणि ‘ट्यूब-ट्रान्स्पोर्ट’ची भर पडली आहे. रेल्वेवर आधारित नव्या प्रवास संकल्पनांमध्ये मॅगलेव्हचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. यामध्ये वापरलेल्या डब्यांना चाके नसतात, तर विद्युतचुंबकीय पद्धतीने ते रुळांवरून पुढे सरकतात. चुंबकीय आकर्षण-अपसरणाची ही क्रिया अतिशय वेगाने होत असल्याने आणि कोणतेही प्रत्यक्ष घर्षण नसल्याने याद्वारे ताशी १००० किमी वेगानेही प्रवास करता येतो. दुसरी पद्धत म्हणजे बंद नळीच्या दोन टोकांकडील हवेचा दाब कमी-जास्त करून जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहन पाठवणे. यामध्येही खूपच वेग गाठता येत असला तरी हवेची अगदी किंचितही गळती न होण्यासाठी फारच दक्षता घ्यावी लागते. अवकाशयान किंवा विमान ज्या पद्धतीने आणि गतीने मार्गक्रमण करते तशी स्थिती पृथ्वीवरही निर्माण करता येईल, असा दावाही एका कंपनीने केला आहे. हायपरलुप आणि तत्सम प्रवास-संकल्पनांमध्ये नळीतील विद्युतचुंबकीय शक्ती, दाबाखालील हवा आणि निर्वात (व्हॅक्युम) अशा सर्वच बाबींचा समन्वय करण्याचा प्रयत्न आढळतो.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे