शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरच लागला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा शोध; वाकड येथील तरुणाच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 21:13 IST

हॉटेलमध्ये राहिला कोविड पॉझिटिव्ह

पिंपरी : वाकड येथील एका हॉटेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कोरोनाचा विळखा वाढत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. शहर परिसरात वाढणाऱ्या रुग्णवाढीबाबत प्रशासन सजग नसल्याचे दिसून येत आहे. खासगी रुग्णालये, खासगी कोविड सेंटरवर महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. विठ्ठलवाडी सिंहगड रस्त्यावरील २७ वर्षीय तरूण हा वाकड, भूमकर चौकातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता.  तो २१ मार्चला तिथे आला होता. त्यानंतर तरूण गंभीर झाल्यानंतर त्यास २५ मार्चला रात्री सव्वा नऊला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रात्री साडेदहा वाजता त्याचा मृत्यू झाला. २५ मार्चला मृत्यू झाला.  कोविडमुळे त्या तरूणाचा मृत्यू झाला आहे, असे वैद्यकीय तपासणी अहवालात नमूद केले आहे.  

कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती संकलित करत असताना हा रुग्ण वाकड मधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मृत्यू झालेल्या हॉटेलमध्ये असणारे सीसीसी सेंटरबाबत माहिती मागविली आहे.................खासगी हॉटेलमध्ये सीसीसी सेंटरयाबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, ‘‘ सध्या हॉटेलमध्ये कोणत्याही सीसीसी सेंटरला महापालिकेने परवानगी दिलेली नाही. शहरातील शासकीय कोवीड सेंटरची माहिती महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. वाकड येथील प्रकरणाबाबत आम्हाला अद्याप कोणतीही माहिती नाही. याबाबत तपासणी करू. ’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्तhotelहॉटेलDeathमृत्यू