शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गर्दी जमवली ! अमित शहांच्या कार्यक्रमासाठी भाजपची धावपळ यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 19:09 IST

राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमाला  माणसे जमवण्यात यश आल्याचे पाहायला मिळाले.

पुणे : इतर पक्षांसारखी गर्दी व्हायला हवी, संपूर्ण सभागृह भरावे यासाठी भारतीय जनता पार्टीची पुण्यातली मेहनत अखेर फळाला आली असून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमाला  माणसे जमवण्यात यश आल्याचे पाहायला मिळाले.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित 12व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यान रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी 'आर्य चाणक्य-जीवन और कार्य :आज के संदर्भ में' हा विषय शहा यांनी  विशद केला.यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आदी उपस्थित होते.

    या कार्यक्रमासाठी शहर भाजपने कंबर कसली होती.विशेषतः नगरसेवक, युवा मोर्चाला टार्गेट्स देण्यात आली होती.याशिवाय प्रतिष्ठीत मान्यवरांना येणार असल्याची खात्री करून घेत आमंत्रण पत्रिका देण्यात आली होती.कार्यक्रमप्रसंगी गर्दी झाल्यावर सगळ्यांनीच हुश्श केले. महापालिका इमारतीच्या उदघाटन समारंभात छत गळायला लागल्याने शहर भाजपवर टीका करण्यात येत होती. तसा कुठलाही प्रकार आज होऊ नये म्हणून पदाधिकाऱ्यांनी विशेष जोर लावला होता.

टॅग्स :Amit Shahअमित शाह