आंदोलनानंतर महावितरणला जाग
By Admin | Updated: December 8, 2015 00:05 IST2015-12-08T00:05:52+5:302015-12-08T00:05:52+5:30
पेरणे गावात अखंड विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी शांततामय व सांप्रदायी मार्गाने आंदोलन करून वीज मंडळाच्या कार्यालयास कुलूप ठोकले होते.

आंदोलनानंतर महावितरणला जाग
लोणीकंद : पेरणे गावात अखंड विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी शांततामय व सांप्रदायी मार्गाने आंदोलन करून वीज मंडळाच्या कार्यालयास कुलूप ठोकले होते. या आंदोलनाने विद्युत मंडळाचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यामुळे तातडीने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात झालेल्या ग्रामस्थ व वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन महिन्यांत २४ तास विद्युत पुरवठा करू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
पेरणे गावालगत वीज मंडळाचे ४००/ के.व्ही. क्षमतेचे पॉवर हाऊस आहे. तरीही गावात बारा तास भारनियमन होते. त्यामुळे परिसरातील शेतीचा प्रश्न अत्यंत गंभीर होत आहे. त्यामळे २४ तास विद्युत पुरवठ्याकरिता ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी होती.
कार्यालयास कुलूप लावण्याचे आंदोलन करण्यात आले होते. याबाबत ‘लोेकमत’ने आवाज उठवला होता. त्यामुळे वीज मंडळ खडबडून जागे झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या पुढाकाराने तातडीची बैठक घेण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांनी केलेली रास्त मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
प्रदीप कंद, विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र पवार तसेच या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मंडळाच्या ढिसाळ कारभाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीमध्ये आंदोलनकर्ते, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामान्य नागरिक अशी सर्वांची लक्षणीय उपस्थिती होती. वीज मंडळाकडून दोन दिवसांत लेखी पत्रही देण्यात येणार आहे. (वार्ताहर)अडचणी आहेत म्हणून आपण एकत्र येतो, पण त्या सोडविण्यासाठी वेळही दिला पाहिजे. गावातील विविध प्रश्नांसाठी मी गावाच्या बाजूने असेन.
- प्रदीप कंद, अध्यक्ष,
पुणे जिल्हा परिषदडिंग्रजवाडी येथून स्वतंत्र लाईन टाकून पेरणे गावठाणात स्वतंत्र फिडर बसवणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
- राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता, विद्यूत मंडळ