पुणे : शिवाजीनगर न्यायालयातील कनिष्ठ लिपिसास ३०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.तक्रारदार शिवाजीनगर न्यायालयात वकील आहेत. न्यायालयातील कोर्ट क्र. २९ मधील कनिष्ठ लिपीक पालवे याने तक्रारदार यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली. या वेळी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची ६ फेब्रुवारी रोजी पडताळणी केली असता कनिष्ठ लिपीक शरद पालवे याने तक्रारदाराकडे ५०० रुपयांची मागणी करून ३०० रुपयांवर तडजोड झाली. आज (दि. ६) सापळा रचून ३०० रुपये स्वीकारताना त्यास ताब्यात घेण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
३०० रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजीनगर न्यायालयातील लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 16:54 IST
शिवाजीनगर न्यायालयातील कनिष्ठ लिपिसास ३०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
३०० रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजीनगर न्यायालयातील लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात
ठळक मुद्देतक्रारदार शिवाजीनगर न्यायालयात आहेत वकीलतक्रारदाराकडे ५०० रुपयांची मागणी करून ३०० रुपयांवर तडजोड