महावितरणच्या लाच खोर अभियत्यांकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता, चालु वर्षात सहा लाचखोर अटकेत, सोलापूर लाचलुचपत विभागाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:15 PM2018-02-03T13:15:32+5:302018-02-03T13:16:59+5:30

पंढरपूर येथील महावितरणच्या लाचखोर सहायक  अभियंता संतोष सोनवणे याला सहकाºया सोबत १५ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगहात पकडले होते.

MahaVitaran's bribe of real estate worth crores rupees, six bribe holders in the current year, information about Solapur bribe department | महावितरणच्या लाच खोर अभियत्यांकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता, चालु वर्षात सहा लाचखोर अटकेत, सोलापूर लाचलुचपत विभागाची माहिती

महावितरणच्या लाच खोर अभियत्यांकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता, चालु वर्षात सहा लाचखोर अटकेत, सोलापूर लाचलुचपत विभागाची माहिती

Next
ठळक मुद्दे बँक खात्याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण देवकर यांनी दिली़सोनवणेच्या पोलीस कोठडीत वाढचालु वर्षोत सहा लाचखोर अटकेत


अमित सोमवंशी
सोलापूर दि ३ :  पंढरपूर येथील महावितरणच्या लाचखोर सहायक  अभियंता संतोष सोनवणे याला सहकाºया सोबत १५ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगहात पकडले होते. चौकशी दरम्यान, सोनवणे याच्याकडे १ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता सापडली असून त्याच्या बँक खात्याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण देवकर यांनी दिली़
करकंब येथील वीज वितरणचे आॅपरेटर चंद्रकांत परशुराम जाधव यांची खातेनिहाय चौकशी सुरू होती. या चौकशीमध्ये दोन वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आल्या होत्या. ही शिक्षा कमी करण्यासाठी व निलंबनाचा कालावधी संपुष्टात आणण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच घेताना सहाय्यक अभियंता संतोष सोनवणे यास ३० जानेवारी रोजी अटक केली होती.  त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर आणि त्यांच्या पथकाने सोनवणे यांच्या मालमत्तेची माहिती घेतली असता त्याच्या कडे पंढरपूरात तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता सापडली असून त्याने दुसरी कडे  मालमत्ता खरेदी केली आहे का, याचा शोध सुरु असल्याचे देवकर यांनी सांगितले.
----------------
सोनवणेच्या पोलीस कोठडीत वाढ
आरोपी सोनवणे यापूर्वी घेतलेले ४० हजार रूपये हस्तगत करावयाचे आहेत, याशिवाय अन्य मालमत्ता तपासणीसाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली.  न्यालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोनवणेला आणखी  तीन दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली.  सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सारंग वांगीकर तर आरोपीतर्फे अ‍ॅड. एन. डी. जोशी, अ‍ॅड. टी. यु. सरदार यांनी काम पाहिले.
--------------
चालु वर्षोत सहा लाचखोर अटकेत
लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांना पर्दाफाश करण्याची जबाबदारी शासनाने लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लाचखोर पकडण्याच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत चालली आहे. तर चालु वर्षेत सहा जणांना लाच घेतांना पकडले. त्यात वर्ग दोनच्या दोन अधिकाºयांचा समावेश असल्याचे सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर यांनी सांगितले.
---------------
लाचखोराविरुध्द तक्रार करणे सोपे
एसीबीच्या कारवाईसाठी नागरिकांचा प्रतिसाद महत्वाचा आहे, हे ओळखुन टोल फ्री क्रमांक, आॅनलाईन तक्रारी घेणे सुरु केले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील युनिटला दोन मोबाईल दूरध्वनी क्रमांक, व्हॉटसअ‍ॅप नंबर जनतेच्या संपर्कासाठी उपलब्ध करुन दिले. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपºयातील नागरिकांना लाचखोराविरुध्द तक्रार करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे लाचखोरांच्या तक्रारीत वाढ झाली आहे.

Web Title: MahaVitaran's bribe of real estate worth crores rupees, six bribe holders in the current year, information about Solapur bribe department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.