एका नगरसेवकासह ३५ जणांचा अर्ज बाद

By Admin | Updated: February 5, 2017 03:32 IST2017-02-05T03:32:05+5:302017-02-05T03:32:05+5:30

शहरातील प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ मधून काँग्रेसतर्फे उमेदवारीअर्ज दाखल केलेले विद्यमान नगरसेवक सद्गुरु कदम यांच्यासह विविध प्रभागांतील ३५ अर्ज छाननीमध्ये बाद ठरले.

After 35 applications were filed with a corporator | एका नगरसेवकासह ३५ जणांचा अर्ज बाद

एका नगरसेवकासह ३५ जणांचा अर्ज बाद

पिंपरी : शहरातील प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ मधून काँग्रेसतर्फे उमेदवारीअर्ज दाखल केलेले विद्यमान नगरसेवक सद्गुरु कदम यांच्यासह विविध प्रभागांतील ३५ अर्ज छाननीमध्ये बाद ठरले. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी न केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.
महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष, तसेच अपक्ष उमेदवारांचे २३०४ अर्ज दाखल झाले होते. ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सकाळी ११पासून अजाच्या छाननीचे काम सुरू होते. प्रतिस्पर्ध्यांनी नोंदविलेल्या आक्षेपांनुसार संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
प्रभाग क्रमांक ९ मधून जागा ड - सर्वसाधारण वर्गासाठी कदम यांनी काँग्रेसतर्फे अर्ज भरला होता. मात्र, आॅनलाइन पद्धतीने भरावयाच्या अर्जावर त्यांची स्वाक्षरी नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केला. या वेळी सद्गुरू कदम यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. मात्र, उमेदवाराची स्वाक्षरी नसल्यामुळे अर्ज नियमानुसार ग्राह्य धरता येणार नाही, असे स्पष्टीकरण देत अधिकारी भूमिकेवर ठाम राहिले. न्यायालयात दाद मागू शकता, असा सल्लाही अधिकाऱ्यांनी दिला.
प्रभाग क्रमांक २० क गटामधील एका अपक्ष उमेदवाराचे पिंपरी पालिका हद्दीत कोठेच मतदार यादीत नाव नाही. त्यामुळे त्याचा अर्ज बाद करण्यात आला. अनधिकृत बांधकामे, पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मवर व्हाइटनर लावला असल्याचा आक्षेप घेतला, तर काहींनी कर थकबाकी या मुद्द्यावर आक्षेप नोंदविला. समर्थक कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)

खराळवाडीत काँगे्रसला धक्का
कैलास कदम व सद्गुरू कदम हे बंधू विद्यमान नगरसेवक होते. त्यापैकी कैलास कदम यांनी अर्ज भरला नव्हता. सद्गुरू यांचा अर्ज बाद झाल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ ब मधून माजी नगरसेविका सोजरबाई ससाणे, ९ क मधून भाजपाच्या युवा मोर्चाच्या माजी प्रदेश सचिव वीणा सोनवलकर यांनी अपक्ष दोन अर्ज दाखल केले होते. त्यातील एक बाद झाला. प्रभाग क्रमांक १० अ मधून भारती चांदणे, २० अ मधून सुहासिनी बेंगार, सीमा धुंरधरे, २० ब मधून कैलास नरवटे यांचे अर्ज बाद झाले.असे निवडणूक निर्णय अधिकारी सोनाप्पा यमगर यांनी सांगितले.

Web Title: After 35 applications were filed with a corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.