तब्बल ३० वर्षांनंतर भरला पुन्हा वर्ग, जुन्या आठवणींना उजाळा देत वर्गमित्र रंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:25+5:302021-02-05T05:09:25+5:30
सर्व माजी विद्यार्थी मेळाव्याचे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित न्यू इंग्लिश स्कूल विंझर येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन ...

तब्बल ३० वर्षांनंतर भरला पुन्हा वर्ग, जुन्या आठवणींना उजाळा देत वर्गमित्र रंगले
सर्व माजी विद्यार्थी मेळाव्याचे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित न्यू इंग्लिश स्कूल विंझर येथे माजी विद्यार्थी
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यासाठी सन १९९०-९१ चे ६५ विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी मेळाव्याची सुरुवात सरस्वती पूजनांनी करण्यात आली. आपापल्या शेजारी बसलेल्या मित्रांमध्ये कितीतरी बदल झाल्याचा पाहावयास मिळत होता. एकमेकांना ओळखणे सुद्धा अशक्य झाले होते. तर सवंगडी भेटल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देत होते. यावेळी शोभा लिम्हण, सयाजी शेंडकर शैलेश वालगुडे, किसन करंजकर, संजय वालगुडे, ज्ञानेश्वर भोसले आदींनी मनोगते व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यापैकी
काही विद्यार्थी मृत पावल्याने या सर्व मृ्त झालेल्या सवंगडयांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली, तर या कार्यक्रमासाठी सन १९९०-९१ चे शिक्षक पी. एस. वायकर, बी. टी. पवार, एस पी. बाविस्कर, एन. एस. पावसे, ए. आर. राठी, एस. एम. आमंदे, बी. यु. पाकसे, प्राचार्य बी. डी. मोरे, बी. एम. शेख आदीसह विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक झाकीर जमादार यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा लिम्हण यांनी केले. शैलेंद्र वालगुडे यांनी आभार मानले.
--
फोटो क्रमांक : २८मार्गासनी गेट टुगेदर
फोटो ओळ- विंझर (ता. वेल्हे) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे एकत्र जमलेले माजी विद्यार्थी.