२८ वर्षांनंतर घरफोड्या पोलिसांच्या तावडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:18+5:302021-04-11T04:12:18+5:30
पुणे : १९९२ पासून घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांना गुंगारा देणा-या आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली. विष्णू सुंदरराव ...

२८ वर्षांनंतर घरफोड्या पोलिसांच्या तावडीत
पुणे : १९९२ पासून घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांना गुंगारा देणा-या आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली. विष्णू सुंदरराव विटकर (वय ४५, रा. हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
विटकर याने १९९२ मध्ये कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केली होती.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे सहायक पोलीस फौजदार निंबाळकर यांना कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९९२ मध्ये घरफोडी करणारा आरोपी वीटकर हा हडपसर गाडीतळ येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, कर्मचारी संतोष क्षीरसागर, सुजित पवार, विल्सन डिसोझा यांच्या पथकाने सापळा रचून विटकर याला ताब्यात घेतले. त्याने घरफोडीचा गुन्हा कबुल केला. पुढील तपासासाठी त्याला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.