बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी अफगाणी पतीची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST2020-11-26T04:27:41+5:302020-11-26T04:27:41+5:30
पुणे : बलात्काराच्या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर त्याने पिडीत तरुणीबरोबर विवाह केला़ लग्न केल्यानंतर बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी तो ...

बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी अफगाणी पतीची मारहाण
पुणे : बलात्काराच्या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर त्याने पिडीत तरुणीबरोबर विवाह केला़ लग्न केल्यानंतर बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी तो तिला मारहाण करुन लागला़ लग्नानंतर तीन महिन्यात या पिडीत महिलेने कौटुंबिक हिंसाचाराची फिर्याद दिली़ समर्थ पोलिसांनी या अफगाणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
आरोपी पती हा मुळचा अफगाणिस्तानचा आहे़ तो २०१५ माध्ये शिक्षणासाठी पुण्यात आला होता़ ही तरुणीही त्याच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती़ दोघांमध्ये ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले़ त्याने लग्नाचे आमिष दाखवून २०१७ मध्ये बलात्कार केला़ या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन त्याला अटक करण्यात आली. दोन वर्षे तुरुंगात काढल्यानंतर फेबुवारी २०१९ मध्ये त्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.
त्यानंतर त्याने या तरुणीला ‘जे झाले आहे ते विसरुन जा़ आपण लग्न करु, मी तुझ्याशी प्रेमाने राहीन,’ असे म्हणत विवाह करण्याचा आग्रह केला. समाजात बदनामी नको, म्हणून संबंधित तरुणीने त्याला होकार दिला़ त्यानुसार २३ सप्टेंबर २०२० मध्ये त्यांचा विवाह झाला़ विवाहानंतर त्याने लगेचच तिच्याकडे बलात्काराची तक्रार मागे घेण्याचा तगादा लावला़ तिला वारंवार मानसिक त्रास देऊन मारहाण करु लागला़ तिला जीवे मारण्याची धमकी देऊन छळ करु लागला़ यामुळे घाबरलेल्या या तरुणीने जीवाच्या भितीने लग्नानंतर तीन महिन्यांच्या आतच पतीविरुद्ध फिर्याद दिली. समर्थ पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.