शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मांजामुळे कापला वकीलाचा गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 19:06 IST

पतंगासाठी वापरण्यात येणा-या नायलॉनच्या मांजाने दुचाकीवरून घरी निघालेल्या वकिलाचा गळा कापल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १ वाजता वडगावशेरी येथे घडली.

पुणे : पतंगासाठी वापरण्यात येणा-या नायलॉनच्या मांजाने दुचाकीवरून घरी निघालेल्या वकिलाचा गळा कापल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १ वाजता वडगावशेरी येथे घडली. 

               या दुर्घटनेत अ‍ॅड. महेश गोगावले आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. मांज्यामुळे शहरात यापुर्वी देखील दुर्घटना घडल्या आहेत. तरीही या मांज्याची विक्री आणि त्याचा वापर करणा-यांवर पोलीस व महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते. अ‍ॅड. गोगावले हे त्यांचा ८ वर्षांचा मुलगा ऋवेद याला घेवून दुचाकीवरून फिनिक्स मॉलमार्गे वडगावशेरी येथे असलेल्या त्यांच्या घरी जात होते. ते सोमनाथनगर येथील रामचंद्र सभागृह येथे आले असता ही घटना घडली. मांजामुळे गळा कापल्याने अ‍ॅड. गोगावले दुचाकीवरून पडले. त्यात त्यांच्या मुलाला हात आणि पायाला जखमा झाल्या. गळा कापल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्तश्राव झाला होता. त्यामुळे अ‍ॅड. गोगावले यांनी अपघातानंतर त्वरीत स्वत:ला सावरत जवळचे रुग्णालय गाठले. सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. पतंगासाठी वापरण्यात येणारा मांजा अनेकांच्या जीवावर बेतल्यानंतर चायनीज, नायलॉनच्या मांज्याच्या वापरावर राष्ट्रीय हरीत प्राधिकरणाने (एनजीटी) जुलै २०१७ साली बंदी घातली आहे. मात्र त्याचा शहरात सर्रासपणे वापर सुरू आहे. 

       मांज्यामुळे आत्तापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बंदी असतानाही रर्सार त्याची विक्री होताना दिसते. त्यामुळे या मांजाची विक्री करणा-यांवर सरकारने कडक कारवाई करावी. तसेच त्याचे उत्पादन व विक्री त्वरीत थांबवावी असे अ‍ॅड. गोगावले यांनी सांगितले. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. 

दोघांनी गमवला जीव माज्यांमुळे ८ आॅक्टोंबर रोजी एका महिलेला डॉक्टरला जीव गमवावा लागला. रुपाली निकम असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. नाशिक फाट्याजवळ ही घटना घडली होती. त्याआधी एका महिला पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. काही वर्षांपुर्वी येरवडा परिसरात एक मांज्यामुळे मुलगा जखमी झाला होता. त्याचे दोन्ही गाल, कानाला कापले होते. तसेच, कोंढवा परिसरातही एक मुलगा जखमी झाला होता. एसपी कॉलेजच्या महाविद्यालयातील एका झाडावर मांज्यामध्ये घार अडकली होती. तिची सुटका अग्निशामक दलाकडून करण्यात आली होती.

टॅग्स :advocateवकिलAccidentअपघातkiteपतंग