शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चेक न वटल्यामुळे वकिलाला तीन महिने कारावासाची शिक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 21:38 IST

गुंतवणूक करण्यासाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेले चेक न वटल्याप्रकरणी शहरातील एका वकिलाला तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देपैसे परत न केल्यास सहा महिने साधा तुरुंगवास, गुंतवणुकीसाठी घेतली होती रक्कम  

पुणे : गुंतवणूक करण्यासाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेले चेक न वटल्याप्रकरणी शहरातील एका वकिलाला तीन महिने कारावासाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी सुनावली. तसेच मुदतीत पैसे परत न केल्यास सहा महिने साधा कारावास भोगावा लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.     दशरथ रामचंद्र घोरपडे (वय ४५, रा, वृषाली कॉम्लेक्स, तावरे कॉलनी) असे शिक्षा देण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी सरफराज अहमद शेख यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी हे हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. शेख आणि घोरपडे हे चांगले मित्र होते. घोरपडे हे वकील असून त्यांचा सातारा रस्त्यावर रिअल इस्टेट व टुरीस्टचा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. स्थावर मिळकती संदर्भात व्यवहार न झाल्यास दिलेल्या पैशांवर १२ टक्क्यांप्रमाणे व्याज देण्याचे घोरपडे यांनी शेख यांना सांगितले. त्यानुसार डिसेंबर २००४ मध्ये फिर्यादी, त्यांची पत्नी व मुलगी यांनी घोरपडे यांच्या व्यवसायत प्रत्येक ३ लाख असे एकूण ९ लाख रुपये गुंतवले. मात्र घोरपडे यांचा सांगितल्याप्रमाणे स्थावर मिळकती संदर्भात कोणताही व्यवहार झाला नाही. त्यामुळे परतावा म्हणून शेख यांना १२ टक्के दराने व्याज परत केले. मात्र २००९ पासून घोरपडे यांनी अचानक परतावा देण्याचे थांबवले. शेख यांनी सतत पैशांची मागणी केल्याने त्यांना तीन लाखांचे तीन चेक देण्यात आले. मात्र ते बाऊंस झाले. त्यानंतर पुन्हा ३ लाख २० हजार रुपयांचे तीन चेक देण्यात आले होते. तेही वटले नाहीत. मार्च २०११ मध्ये शेख यांनी दिलेली मुद्दल आणि त्यावरील व्याज असे मिळून घोरपडे यांनी पुन्हा १२ लाख ७१ हजार ३६९ रुपयांचे दोन चेक दिले होते. त्यामुळे दिलेले चेक वटत नसल्याप्रकरणी शेख यांनी घोरपडे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. या खटल्यात शेख यांच्यावतीने एस. बी. लॉ असोसिएट्सचे अ‍ॅड.सिद्धार्थ देसाई यांनी कामकाज पाहिले.      प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी या प्रकरणी यापुर्वी आरोपीला सहा महिने साध्या कारावासाची आणि दिलेल्या मुदतीत पैसे परत न केल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या निकालाविरोधात अ‍ॅड. घोरपडे सत्र न्यायालयात गेले होते. सत्र न्यायालयाने कारावासाचा कालावधी कमी करून शिक्षा कायम ठेवली.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीbankबँक