मुलासाठीचा ‘सल्ला’ पडला महागात

By Admin | Updated: November 13, 2014 00:24 IST2014-11-13T00:24:37+5:302014-11-13T00:24:37+5:30

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (पीसीपीएनडीटी अॅक्ट) अंतर्गत शिवाजीनगर प्रथम वर्ग न्यायदंडाधिका:यांकडे खटला दाखल करण्यात आला आहे.

The advice for the child fell | मुलासाठीचा ‘सल्ला’ पडला महागात

मुलासाठीचा ‘सल्ला’ पडला महागात

पुणो : संततीप्राप्तीबरोबरच वंशाचा दिवा समजला जाणारा मुलगा कसा  होईल, याविषयी पुस्तकांमधून विवेचन करणा:या दोन लेखक तसेच ही पुस्तके प्रकाशित करणा:या प्रकाशकांविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गर्भधारणपूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (पीसीपीएनडीटी अॅक्ट) अंतर्गत शिवाजीनगर प्रथम वर्ग न्यायदंडाधिका:यांकडे खटला दाखल करण्यात आला आहे. 
महापालिकेच्या सहायक आरोग्यप्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी ही माहिती दिली. या पुस्तकांविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील झोळे या गावातील सामाजिक कार्यकर्ते गणोश बो:हाडे यांनी महापालिकेकडे तसेच राज्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केलेली होती. डॉ. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूराव पिंपरीकर यांनी लिहिलेल्या तसेच उमा पब्लिकेशन या संस्थेने प्रकाशित केलेल्या सिद्धयंत्र या पुस्तकात पुत्रप्राप्तीसाठी काय पूजा करावी, कोणते श्लोक म्हणावेत, तसेच कोणत्या प्रकारचे नैवेद्य अर्पण करावे याबाबत माहिती दिली आहे. 
दुसरा खटला लेखक वि. वा. चौधरी यांनी लिहिलेल्या ‘मुलगा कसा होईल’ या पुस्तकावरून दाखल करण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशक राजेश प्रकाशन, पुणो हे आहेत. या पुस्तकातही 19 आणि 2क्व्या प्रकरणामध्ये संतती जन्मास येण्यासाठी काय करावे, तसेच मुलगा तसेच मुलगी होण्यासाठी काय करावे याचे विवेचन करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार बो:हाडे यांनी पुराव्यासह आरोग्य विभागाकडे केली होती. (प्रतिनिधी)
 
पहिलीच कारवाई.. 
4विशेष म्हणजे या प्रकाराबाबत बो:हाडे यांनी दोन वर्षापूर्वी तक्रार केली होती. मात्र, त्याबाबत दखल घेतलेली नव्हती. त्यानंतर आता महापालिकेने या कायद्याच्या आधारे पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच लेखक आणि प्रकाशकांवर कारवाई करण्याची वेळ आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या जाहिराती करणा:या  पालिकेने कारवाई केलेली असल्याचे डॉ. जाधव म्हणाल्या. 

 

Web Title: The advice for the child fell