कोविड केअर सेंटरकरिता वैद्यकीय सेवकांसाठी जाहिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:10 IST2021-03-27T04:10:30+5:302021-03-27T04:10:30+5:30

पुणे : होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध असला तरी अनेकांना घरात विलग राहता येत नसल्याने, अशांसाठी महापालिकेने पुन्हा कोविड केअर ...

Advertisement for Medical Servants for Covid Care Center | कोविड केअर सेंटरकरिता वैद्यकीय सेवकांसाठी जाहिरात

कोविड केअर सेंटरकरिता वैद्यकीय सेवकांसाठी जाहिरात

पुणे : होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध असला तरी अनेकांना घरात विलग राहता येत नसल्याने, अशांसाठी महापालिकेने पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत़ तसेच वाढत्या रुग्णसंख्येमुळे या सेंटरमध्ये आणखी वाढ करणे आवश्यक असल्याने, येथील वैद्यकीय सेवेसाठी महापालिकेने कंत्राटी पध्दतीने १०० डॉक्टरांसह ३०० नर्स (परिचारिका) करिता जाहिरात दिली आहे़

शहरात सध्या हडपसर येथील बनकर शाळा, रक्षकनगर येथे व संत ज्ञानेश्वर सभागृह येरवडा येथे महापालिकेचे कोविड केअर सेंटर सुरू झाले आहेत़ येथे आजमितीला सुमारे साडेतीनशे कोरोनाबाधित दाखल आहेत़ परंतु, येथेही सर्व रुग्ण हाताळण्यासाठी तसेच त्यांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याकरिता मनुष्यबळाची आणखी आवश्यकता आहे़ याचबरोबर शहराच्या अन्य भागात कोविड सेंटर सुरू केल्यावर तेथेही वैद्यकीय सेवकांची आवश्यकता भासणार आहे़

सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे असलेला वैद्यकीय सेवक वर्ग महापालिकेच्या रुग्णालयांत वैद्यकीय सुविधा देण्याबरोबरच लसीकरणाचेही काम पाहत आहे़ यामुळे कोविड सेंटरकरिता कंत्राटी पध्दतीने महापालिकेने ६ महिन्यांकरिता पुन्हा भरती प्रक्रिया राबविली आहे़ यात ५० एमबीबीएस डॉक्टर, ५० बीएमएमएस डॉक्टर, १०० परिचारिका, १०० परिचारक व १०० आया यांची भरती करण्यात येणार आहे़

--------------------------------

Web Title: Advertisement for Medical Servants for Covid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.