शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत व्यवस्थापनच्या जागेवर प्रगती पॅनलचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 11:55 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यस्थापनच्या प्रतिनिधी पदांच्या ५ पैकी ३ जागा पटकावून विद्यापीठ प्रगती पॅनलने बाजी मारली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यस्थापनच्या प्रतिनिधी पदांच्या ५ पैकी ३ जागा पटकावून विद्यापीठ प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. तर विद्यापीठ एकता पॅनलला २ जागा मिळाल्या आहेत. नोंदणीकृत पदवीधरची मतमोजणी सुरु असून त्याचा निकाल रात्री उशीर पर्यन्त लागण्याची शक्यता आहे. व्यवस्थापन प्रतिनिधी पदांच्या जागेवर विद्यापीठ प्रगती पॅनलचे संदीप कदम, राजेंद्र विखे-पाटील विजयी झाले तर सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून आल्या. विद्यापीठ प्रगती पॅनेलचे सोमनाथ पाटील, श्यामकांत देशमुख विजयी झाले.मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ५६ मते घेऊन सोमनाथ पाटील विजयी झाले. त्यानंतर चौथ्या फेरीत श्यामकांत देशमुख ५१, संदीप कदम ४५ तर राजेंद्र विखे-पाटील ४२ मते घेऊन विजयी झाले.

व्यवस्थापन प्रतिनिधी पदाच्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकही उमेदवार नसल्याने ती जागा रिक्त राहिली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली. नोंदणीकृत पदवीधरांच्या मतांची छाननी सुरू आहे. पदवीधरच्या १० जागांसाठी १९ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.

मुख्यमंत्र्याच्या भावाच्या निकालाकडे लक्ष - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांनी अधिसभा पदवीधरची जागा लढवलेली आहे. त्यांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रात्री उशीरा पडवीधरचा निकाल जाहीर होईल. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठ