‘बारामती’वर प्रगती, तर ‘लाला’वर ‘शिवनेर’चे वर्चस्व

By Admin | Updated: March 10, 2015 04:52 IST2015-03-10T04:52:00+5:302015-03-10T04:52:00+5:30

बारामती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार प्रगती पॅनलने मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळविला.

Advance of 'Baramati', 'Shivnera' dominates 'Lala' | ‘बारामती’वर प्रगती, तर ‘लाला’वर ‘शिवनेर’चे वर्चस्व

‘बारामती’वर प्रगती, तर ‘लाला’वर ‘शिवनेर’चे वर्चस्व

बारामती : बारामती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार प्रगती पॅनलने मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळविला. सर्व जागा जिंकून बँकेवरील वर्चस्व कायम ठेवले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जयसिंग ऊर्फ बबलू देशमुख यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
त्याचबरोबर खुल्या गटात समीर बागवान, डॉ. विजय भिसे हे उमेदवार होते. त्यामुळे १० जागांसाठी १३ जागांवर लढत झाली.
सर्वसाधारण गटाच्या १० जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात होते. सकाळी ८ वाजता रयत भवन येथे मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी देविदास मिसाळ यांनी काम पाहिले.
प्रत्येक फेरीसाठी ३०० मते मोजण्यात आली. २७ फेऱ्या पार पडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार प्रगती पॅनलचे उमेदवार शिरीष दत्तात्रय कुलकर्णी (५,९३७), उद्धव सोपानराव गावडे (५,९४३), सुभाष रामचंद्र जांभळकर (६,०८७), दिग्विजय पोपटराव तुपे (६,२०४), रमणिक रामजीभाई मोता (६,०७२), अविनाश रमेश लगड (६,०१६), आदेश अनिलकुमार वडुजकर (६,०६७), देवेंद्र रामचंद्र शिर्के (५,८५५), सचिन सदाशिव सातव (६,१४५) आणि विद्यमान चेअरमन श्रीकांत मुरलीधर सिकची (५,७३७) विजयी झाले.
तर, अनुसूचित जाती-जमातीच्या गटातून याच पॅनलचे विजय प्रभाकर गालिंदे (६,६४८) मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. विजयकुमार भिसे यांना ८७९ मते मिळाली.
महिलांच्या गटातून वंदना उमेश पोतेकर, कल्पना प्रदीप शिंदे, इतर मागास प्रवर्गातून कपिल राजेंद्र बोरावके, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातून सुरेश गुलाबराव देवकाते हे बिनविरोध निवडून आले.
राष्ट्रवादीचे नगरसेवक बबलू देशमुख यांना ३ हजार ११३ मते मिळाली. दुसरे विरोधी उमेदवार समीर अब्दुल करीम बागवान यांना १ हजार ८०, तर डॉ. विजयकुमार भिसे यांना ६४९ मते मिळाली. भिसे यांनी दोन गटांतून निवडणूक लढविली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Advance of 'Baramati', 'Shivnera' dominates 'Lala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.